बेळगाव : सुवर्ण विधान सौधसमोर महात्मा गांधी यांच्या २५ फूट उंच पुतळ्याचे अनावरण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते चरखा चालवून करण्यात आले. गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी वर्षानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.(Gandhi statue inauguration )
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, खासदार प्रियांका गांधी, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, विधानसभेचे सभापती यु. टी. खादर, उपसभापती रुद्राप्पा लमाणी, राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर, काँग्रेसचे संयोजक सचिव वेणू गोपाल, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, राज्याचे कायदा, न्याय, मानव हक्क, संसदीय कामकाज व पर्यटन खात्याचे मंत्री एच. के. पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव व कर्नाटक राज्य प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, जयराम रमेश आदी उपस्थित होते.(Gandhi statue inauguration )
आजच्या या महात्मा गांधी पुतळा अनावरणाचे औचित्य साधून गदग येथील ग्रामीण विकास आणि पंचायत पंचायत राज्य विद्यापीठाचे नामांतर महात्मा गांधी ग्रामीण विकास आणि पंचायत पंचायत राज्य विद्यापीठ करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. विद्यापीठाच्या फलकाचे खासदार प्रियांका गांधी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. सुरेश नाडगौडर उपस्थित होते.(Gandhi statue inauguration )
यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘गांधीजींनी देश बांधणीची घोषणा पहिल्यांदा बेळगावात दिली. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात देशाच्या संविधानाची निर्मिती झाली. त्या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आम्ही काँग्रेसजन संविधानाच्या बाजूने आहोत तर भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या विरोधात आहे. आपण संविधानाचे रक्षण केले तर संविधान आपले संरक्षण करेल. अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्ष संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.(Gandhi statue inauguration )
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली १९२४ मध्ये बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी उत्सवानिमित्त माहिती व सार्वजनिक संपर्क खात्याने तयार केलेल्या गांधी भारत स्मरणिकेचे प्रकाशन खर्गे, प्रियांका गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व सार्वजनिक संपर्क खात्याचे आयुक्त हेमंत निंबाळकर हेही उपस्थित होते. कन्नड आणि इंग्रजी भाषेत असलेल्या या स्मरणिकेमध्ये बेळगाव येथील अधिवेशनात महात्मा गांधीजींनी केलेले अध्यक्षीय भाषण आणि घेतलेल्या निर्णयाचा समावेश आहे.
LIVE: Jai Bapu, Jai Bhim, Jai Samvidhan Maha Rally | Belagavi, Karnataka.https://t.co/OKHgG618IA
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 21, 2025
हेही वाचा :