चेन्नईः जोसेफ विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवा राजकीय अध्याय सुरू केला. ‘थलपती’ विजय या नावाने लोकप्रिय असलेले विजय पांढरा शर्ट, ब्लेझर आणि काळी पँट परिधान करून शपथविधी सोहळ्यात दाखल झाले. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शपथविधी समारंभाला उपस्थित होते. (Vijay to take oath as Tamil Nadu CM)
“सी. जोसेफ विजय येनुम नान” (मी, सी. जोसेफ विजय) असे शब्द उच्चारताच संपूर्ण स्टेडियम घोषणांनी दुमदुमून गेले. त्यांच्या चित्रपटांतील गाजलेल्या संवादांपेक्षाही हा क्षण अधिक रोमांचक ठरला.
नव्या पर्वाची सुरुवात (Vijay to take oath as Tamil Nadu CM)
शपथ घेतल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच भाषणात विजय म्हणाले, “ही एका नव्या सुरुवातीची वेळ आहे. आता खऱ्या धर्मनिरपेक्षतेचा आणि सामाजिक न्यायाचा नवा काळ सुरू होत आहे.” Vijay to take oath as Tamil Nadu CM
ते पुढे म्हणाले, “मी कोणत्याही राजघराण्यात जन्मलेलो नाही. मी तुमच्यापैकीच एक आहे — तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, तुमचा ‘थंबी’ (धाकटा भाऊ) आहे.”
गरीबी आणि उपासमार काय असते, हे आपण अनुभवले असल्याचे सांगत विजय म्हणाले, “मी कुणी देवदूत नाही; मी एक सामान्य माणूस आहे.”
अमली पदार्थांविरोधात इशारा
मुख्यमंत्री विजय यांनी राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराविरोधात कठोर पावले उचलण्याची घोषणा केली. तसेच कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्याबरोबरच शिक्षण, पायाभूत सुविधा आणि मूलभूत सेवांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
ते म्हणाले, “आजपासून मी अमली पदार्थांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू करणार आहे. आपल्या तरुणांना या संकटापासून वाचवणे हे आपले कर्तव्य आहे.” (Vijay to take oath as Tamil Nadu CM)
कायदा-सुव्यवस्थेबाबत ते म्हणाले, “मी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करेन आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची हमी देईन. काही लोक माझा अपमान करतील — ते मित्र असोत किंवा विरोधक — तरीही ते सर्व आठ कोटी लोक माझेच आहेत.”
विजय यांनी शिक्षण, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आणि इतर मूलभूत सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले.
“जनतेच्या पैशातील एक पैसाही मी हात लावणार नाही,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
टीव्हीकेच्या नऊ मंत्र्यांची शपथ
विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षातील नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. विजय यांच्यासह शपथ घेतलेल्या मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे : एन. आनंद, आदव अर्जुन, के. जी. अरुणराज, के. ए. सेंगोट्टैयन, पी. वेंकटरमणन, आर. निर्मल कुमार, राजमोहन, टी. के. प्रभू आणि एस. कीर्तन
निवडणुकांनंतर टीव्हीकेने काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, व्हीसीके आणि आययूएमएल यांच्याशी युती केली होती. या महाआघाडीच्या मदतीने पक्षाने ११८ जागांच्या बहुमताचा टप्पा ओलांडला. (Vijay to take oath as Tamil Nadu CM)
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ टीव्हीकेच्या नेत्यांनाच स्थान देण्यात आले असले, तरी पुढील विस्तारात सहयोगी पक्षांनाही मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.