मुंबई : साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेले वक्तव्य मूर्खपणाचे आहे. त्यांना असे बोलायचे होते तर साहित्य संमेलनात यायची आवश्यकता नव्हती, या शब्दांत ज्येष्ठ नेते व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी गोऱ्हे यांचा समाचार घेतला. (Pawar slams Gorhe)
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, त्यांच्या वक्तव्याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या विधानाशी मी शंभर टक्के सहमत आहे. साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी माफी मागितली. त्यामुळे मी म्हटले आता पडदा टाका. संजय राऊत यांना माझ्यावरही जबाबदारी टाकायची असेल तर माझी तक्रार नाही कारण मी संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो.
गोऱ्हे यांनी शनिवारी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात मुलाखत देताना, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्याला खा. संजय राऊत यांनी सोमवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. (Pawar slams Gorhe)
त्यांनी साहित्य संमेलनात जी राजकीय चिखलफेक झाली. त्याची जबाबदारी शरद पवार झिडकारु शकत नाहीत, ते स्वागताध्यक्ष होते, पालक आहेत, जी राजकीय चिखलफेक झाली, त्याला तेही तितकेच जबाबदार आहेत. त्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली. त्यानंतर संध्याकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, ‘नीलम गोऱ्हे यांनी मर्यादित कालावधीत चार पक्षात प्रवेश केला. त्यांना सेनेने ४ वेळा आमदार कसे केले, हे सर्वांना माहीत आहे. साहित्य संमेलनात त्यांनी असे वक्तव्य करण्याची काही आवश्यकता नव्हती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याबाबत ठाकरे गटाकडून झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, असे सत्कार करण्यासाठी परवानगी आवश्यक असल्यास यापुढे परवानगी घेतली जाईल असा टोला त्यांनी मारला. या सोहळ्यात एकूण १५ जणांना पुरस्कार देण्यात आला होता. मात्र केवळ एकनाथ शिंदे यांचे नाव दाखवण्यात आले, बातमी आली हे योग्य नाही. (Pawar slams Gorhe)
गोऱ्हेंचा ठाकरे गटाकडून निषेध
दरम्यान, गोऱ्हे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाणे, पुणेसह राज्यात विविध ठिकाणी ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, नीलम गोरे यांना राज्यसभा किंवा मंत्रीपद हवे आहे म्हणून त्यांनी हे आरोप केले आहेत. मात्र त्या जबाबदार व्यक्ती असल्याने त्यांच्या विरोधात आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार आहोत. त्यांनी पुरावे द्यावेत, अन्यथा नाक घासून माफी मागितली पाहिजे.
नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी २०१४ मध्ये नीलम गोऱ्हे यांनी विधानसभेचे तिकीट देण्यासाठी आपल्याकडून पैसे घेतले होते, मात्र उमेदवारी दुसऱ्याला देण्यात आली, असा आरोप केला. तसेच ठाकरे गटाचे आमदार देशमुख यांनी आपल्याकडे २५ लाखाची मागणी केली असल्याचे सांगितले. पुण्याचे माजी नगरसेवक अशोक हरनाळ यांनी त्यांची सर्व कुंडली बाहेर काढण्याचा इशारा दिला. (Pawar slams Gorhe)
शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर
नीलम गोऱ्हे यांच्यावर ठाकरे गटाकडून झालेल्या टीकेला शिंदे गटानेही प्रत्युत्तर दिले. महिलेबाबत अशी भाषा वापरणाऱ्या संजय राऊत यांना लाज वाटते की नाही? त्यांना जोड्याने मारले पाहिजे, मराठवाड्यात ठाकरे गटाने अनेक ठिकाणी पैसे घेऊन तिकीट वाटप केले होते. जनतेने त्यांना त्याची जागा दाखवली आहे, अशी टीका समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी केली. तर खा. नरेंद्र मस्के यांनी नीलम गोऱ्हे या कधीच नाशिकच्या संपर्क प्रमुख नव्हत्या. विनायक पांडे यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असा दावा केला.
हेही वाचा :