नागपूर : ‘धार्मिक भावना दुखावल्या’प्रकरणी हिंदू संघटनांच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने करताना धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली नागपूरमधील पोलिसांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. (Nagpur riots)
महाराष्ट्र आणि गोव्याचे प्रभारी विश्व हिंदू परिषदेचे सचिव गोविंद शेंडे आणि इतरांविरुद्ध गणेशपेठ पोलिस ठाण्यात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी ‘पीटीआय’ला सांगितले. (Nagpur riots)
भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) तरतुदींनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विश्व हिंदू परिषद आणि आणि बजरंग दलाच्या ज्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये अमोल ठाकरे, डॉ. महाजन, तयानी, रजत पुरी, सुशील, वृषभ अर्खेल, शुभम आणि मुकेश बारापात्रे यांचा समावेश आहे. (Nagpur riots)
‘औरंगजेबाचे गौरवीकरण सहन करणार नाही,’ असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे देवेश मिश्रा यांनी दिला आहे.
हिंसाचारग्रस्त भागात पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मंगळवारी (१८ मार्च) संचलन केले.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
औरंगजेब वादाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकामध्ये आरोप-प्रत्यारोप झडल्याने मंगळवारी पाहायला मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली.
तुम्ही कबर काढून टाका : उद्धव ठाकरे
‘मी मुख्यमंत्री नाही आणि मी गृहमंत्री नाही, याबाबत (हिंसेमागील) मुख्यमंत्र्यांनाच विचारा. कारण आरएसएसचे मुख्यालय तिथे आहे. येथे डबल इंजिन सरकार आहे; जर डबल इंजिन सरकार अपयशी ठरले असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा… तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यांची (औरंगजेबची) कबर काढून टाकू शकता, परंतु यावेळी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना बोलावून घ्या,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपसह सत्ताधाऱ्यांना लगावला. (Nagpur riots)
अपयश सरकारचे की पोलिसांचे?: पटोले
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले की ही घटना पूर्वनियोजित होती. मी त्यांना विचारू इच्छितो की पोलिसांना माहिती नसेल, तर हे सरकारचे अपयश आहे की पोलिसांचे अपयश?’, असा सवाल पटोले यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना केला.
औरंगजेब देशाचा शत्रू : शिंदे
नागपूर हिंसाचारावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘देशातील खरा मुस्लिमही औरंगजेबाचे समर्थन करणार नाही. औरंगजेब हा महाराष्ट्राचा शत्रू होता, देशाचा शत्रू होता…औरंगजेब देशद्रोही आहे. औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्यांनी इतिहास वाचला पाहिजे आणि ‘छावा’ चित्रपट पाहिला पाहिजे.’
तर या घटनेसाठी अबू आझमी जबाबदार आहेत, असा आरोप महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
मोदी गेल्या जन्मी शिवाजी महाराज होते
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही