मुंबई : प्रतिनिधी : मी ३० वर्षे मुंबईत राहतो पण मला मराठी येत नाही. मी मराठी नाही. राज ठाकरे काय करायचे बोला? अशी मुजोरीची भाषा मुंबईतील उद्योजक सुशिया केडिया यांनी ‘एक्स’वर पोस्ट केल्याने वातावरण तापले आहे. हिंदी सक्तीवरुन मुंबईत रान पेटले असताना केडियाने थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिल्याने भाषिक वाद पेटण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (Kedia challenge Raj Trhckery)
पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा जे.आर. राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा उद्या शुक्रवारी मुंबईतील वरळी येथे होत आहे. या मेळाव्यात ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मेळाव्याच्या आदल्यादिवशीच मुंबईतील उद्योजक सुशील केडियाने एक्स पोस्टद्वारे राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. (Kedia challenge Raj Trhckery)
केडियाने एक्स पोस्ट असे म्हटले आहे, “राज ठाकरे लक्षात घ्या, मी ३० वर्षांपासून मुंबईत राहातो. मला मराठी नीट येत नाही. आणि तुमच्या गैरवर्तनामुळे आता मी निश्चय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसाची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळते, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. मी अशी प्रतिज्ञा करतो. काय करणार बोला? अशा शब्दात आव्हान दिले आहे. (Kedia challenge Raj Trhckery)
या ‘एक्स’ पोस्टनंतर केडिया कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. सुशील केडिया हे एक उद्योजक असून केडिया नॉमिक नावाने त्यांची कंपनी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार आणि नामांकित व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे गेले तीस वर्षे वास्तव्य आहे. त्यांच्या फॉलोअर लिस्टमध्ये भाजपचे केंद्रीय आणि राज्यातील नेते आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि आमदार अतुल भातखळकर यांचा समावेश आहे. (Kedia challenge Raj Trhckery)