ठाणे : प्रतिनिधी : बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार गुन्ह्यातील सह आरोपी तुषार आपटे याला भाजपने नगरसेवकपदाची बक्षिसी दिली आहे. बदलापूर नगरपरिषदेत तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केली आहे. आपटेला स्वीकृत नगरसेवक करणे म्हणजे भाजपचा राजकीय व्यभिचार असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली.
बदलापूर येथील एका शाळेत ऑगस्ट २०२४ मध्ये लहान मुलीवर लैगिंक अत्याचाराची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी कंत्राटी सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. यानंतर शाळा प्रशासनातील आणि व्यवस्थापन समितीमधील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे या कलंकित व्यक्तीला भाजपने बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक नियुक्त केले आहे. आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्याने राज्यात महिला वर्गाकडून संतापाची लाट उसळली आहे. बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तुषार आपटेने भाजपचे नगरसेवक निवडून येण्यासाठी मोठी आर्थिक मदत केली होती. याची परतफेड म्हणून आता भाजपने त्याला स्वीकृत नगरसवेक पदाचे बक्षीस दिले असल्याची चर्चा आहे. (Tushar Apte is a BJP corporator)
बदलापूरातील शाळेत ऑगस्ट २०२४ मध्ये दोन चिमुरड्यांवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बदलापुरातील नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. या गुन्ह्यातील संशयित अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी बदलापूरमध्ये मोठे आंदोलन झाले. संतप्त नागरिकांनी दिवसभर रेलरोको आंदोलन केले होते. नागरिकांच्या उद्रेकानंतर पोलिसांनी या शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक केली होती. तसेच शाळेच्या मुख्याध्यापकावरही गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी शाळा प्रशासनातील आणि व्यवस्थापन समितीमीधील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात होते, त्यात तुषार आपटे हा सहआरोपी होता. तुषार आपटे ४४ दिवस फरार होता. त्याला अटक झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये तुषार आपटेला जामीन मिळाला होता. (Tushar Apte is a BJP corporator)
सप्टेंबर २०२४ मध्ये अक्षय शिंदे याला तळोजा तुरुंगातून बदलापूर येथे ट्रान्झिट रिमांडसाठी नेण्यात येत असताना पोलीस आणि आरोपीमध्ये झटापट झाली. अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करण्यात आला होता. हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात शाळेचा अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार झाले होते. कर्जत येथील एका फार्महाऊसवरुन त्याला अटक करण्यात आली होती. कल्याण येथील न्यायालयात कोतवाल आणि तुषार आपटेविरोधात अजूनही खटला सुरु आहे. या दोघांवर गंभीर आरोप आहेत. अत्याचारापूर्वीचे १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आल्याचाही आरोप आहे. (Tushar Apte is a BJP corporator)