नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियाँमधील केलर भागात मंगळवारी सशस्त्र दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. (LeT Terrorists killed)
या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने शोध मोहीम सुरू केली.
मंगळवारी (१३ मे) राष्ट्रीय रायफल्स युनिटला ही गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, शोपियाँमधील शोकल केलर परिसरात शोधमोहीम राबवली. भारतीय लष्कराने शोधमोहीम सुरू केली त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरू केला. त्याला लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. या दरम्यान झालेल्या भीषण गोळीबारात तीन कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ऑपरेशन प्रगतीपथावर आहे,’’ असे यासंबंधीच्या निवेदनात म्हटले आहे. (LeT Terrorists killed)
जम्मू आणि काश्मीरमधील पहेलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर सीमापार तणाव वाढला आहे. भारत आणि पाकिस्तानने तत्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. त्यानंतर दोनच दिवसांत ही घटना घडली.
पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील भागात ड्रोन हल्ले करून प्रत्युत्तर दिले. हे हल्ले भारतीय संरक्षण यंत्रणेने रोखले परंतु दोन्ही अण्वस्त्रधारी शेजारी देशांमध्ये व्यापक संघर्ष होण्याची भीती निर्माण झाली.
तथापि, युद्धबंदीच्या घोषणेनंतर काही तासांतच, श्रीनगर आणि इतर सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून उल्लंघन करण्यात आले.
दरम्यान, भविष्यात आमच्या भूमीवर होणारे कोणतेही ‘‘दहशतवादी कृत्य’’ हे ‘‘युद्धाचे कृत्य’’ मानले जाईल आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा भारत सरकारने दिला आहे. (LeT Terrorists killed) एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने म्हटले होते की, ‘‘भारतात भविष्यात होणारे कोणतेही दहशतवादी कृत्य देशाविरुद्ध युद्धाचे कृत्य मानले जाईल. त्याला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल.’’
हेही वाचा :
युद्ध म्हणजे सिनेमा नव्हे
भारताच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह कार्यरत