कोलकाता : येथील कोलकाता लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये कॉलेजचे दोन विद्यार्थी आणि एक माजी विद्यार्थी आहे. (Gang Rape in campus)
दक्षिण कोलकाता येथील लॉ कॉलेजच्या आवारात २५ जून रोजी संध्याकाळी कथित लैंगिक अत्याचार करण्यात आला, असे कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी (२७ जून) सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींमध्ये मनोजित मिश्रा (वय वर्षे ३०) प्रमित मुखर्जी (२०) आणि झैब अहमद (१९) यांचा समावेश आहे. त्यापैकी एक माजी विद्यार्थी आहे आणि उर्वरित सर्व कॉलेजचे सध्याचे विद्यार्थी आहेत.(Gang Rape in campus)
पीडितेची कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
‘‘या घटनेतील साक्षीदारांची तपासणी करण्यात आली आणि त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. घटनास्थळी भेट देण्यात आली आणि तेथील पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले,’’ असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
पीडितेच्या तक्रारीवरून कसबा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तिघांची नावे आहेत.
एफआयआर दाखल केलेल्यांपैकी मिश्रा आणि अहमद या दोघांना गुरुवारी (२६ जून) संध्याकाळी ७.३० वाजता तलबागन क्रॉसिंगजवळील सिद्धार्थ शंकर शिशु रॉय उद्यान येथून अटक करण्यात आली.(Gang Rape in campus)
तिसरा आरोपी, मुखर्जी याला शुक्रवारी (२७ जून) दुपारी १२.३० वाजता त्यांच्या घरातून अटक करण्यात आली.
आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे दहा महिन्यांनी लैंगिक अत्याचाराची ही दुसरी घटना घडली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर करण्यात आलेल्या या सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुन्हा एकदा कोलकात्यातील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेवर आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हेही वाचा :
२५० नर्सिंग कॉलेजच्या परवानगीत गौडबंगाल : शरद पवार
हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूचा एकत्र मोर्चा