कोल्हापूर; प्रतिनिधी : किराणामाल दुकानदारांकडून १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून हातकणंगले पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल रविकांत भैरु शिंदे (वय ५० रा. पाच तिकटी, हातकणंगले, मुळ गाव फणसवाडी, ता. भुदरगड) याला रंगेहात पकडले. (ACB Kolhapur)
लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. या गुन्ह्यातील तक्रारदाराचे किराणामाल विक्रीचे दुकान आहे. गेल्या महिन्यात हेड कॉन्स्टेबल शिंदे याने तक्रारदाराला बोलावून तुझ्या दुकानात गुटखा विक्री केले जाते असे सांगून कारवाई टाळण्यासाठी प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचेची रक्कम कमी करा अशी विनंती केल्यावर प्रत्येक महिन्याचे चार हजार रुपये तसेच कुंभोज बिटमध्ये येऊन आपल्याला चार महिने झाले असून चार महिन्याचे १६ हजार रुपये लाच देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीची पडताळणी करुन सापळा रचला. हेड कॉन्स्टेबल शिंदे याला १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलिस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंके, हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, संदीप काशिद, सचिन पाटील, संदीप पवार, गजानन कुराडे यांनी कारवाईत भाग घेतला.
हेही वाचा :