नवी दिल्ली : खोऱ्यात जहाल विचारसरणीच्या लोकांनी राष्ट्रीय चिन्हाचे विद्रुपीकरण केल्याबद्दल जम्मू आणि काश्मीरमधील काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी केलेल्या बेताल वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाने सोमवारी (८ सप्टेबर) काँग्रेसवर जोरदार टीका केली. (Hazratbal emblem row)
‘‘जे झाले ते झाले,’’ असे सांगत झालेल्या मोडतोडी प्रकरणी कारवाई करण्याची गरज नाही, असे अन्वर म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी अन्वर यांच्या वक्तव्यावर टीका केली आणि म्हटले की काँग्रेस पक्ष आता ‘‘उघडपणे देशविरोधी कृत्यांना पाठिंबा देणारा पक्ष झाला आहे.’’
‘‘टुकडे-टुकडे गँगचे नेते’’ असलेल्या राहुल गांधी यांच्या सूचनेवरून अन्वर यांनी हे वक्तव्य केल्याचा दावा भंडारी यांनी केला आहे. (Hazratbal emblem row)
‘‘राहुल गांधींच्या सूचनेनुसार, काँग्रेस खासदार तारिक अन्वर निर्लज्जपणे जम्मू आणि काश्मीरमधील अशोक स्तंभाचे अतिरेक्यांनी केलेले विद्रुपीकरण योग्य ठरवतात! राहुल गांधी हे टुकडे-टुकडे गँगचे नेते आहेत. काँग्रेसने स्वतःला अशा पक्षात बदलले आहे जो उघडपणे देशविरोधी कृत्यांना पाठिंबा देतो,’’ असे भंडारी यांनी एक्स वर पोस्ट केले.
तथापि, अन्वर यांनी जे घडले ते चुकीचे असल्याचे मान्य केले, परंतु जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या ‘‘धार्मिक स्थळाच्या ठिकाणी अशोक चक्र नसते,’’ या विधानाचे आधार घेतला.
‘‘आम्ही कारवाईची मागणी करणार नाही; आमची भूमिका अशी आहे की जे घडले ते चुकीचे होते आणि ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले की कोणत्याही धार्मिक स्थळाच्या ठिकाणी अशोक चक्र (राष्ट्रीय चिन्ह) नसते,’’ असे अन्वर यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला सांगितले.
[राष्ट्रीय चिन्हाचे] विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करावी का असे विचारले असता, अन्वर म्हणाले, ‘‘काही गरज नाही. जे झाले ते झाले.’’ (Hazratbal emblem row)
ओमर अब्दुल्ला यांच्या पक्षाचे आमदार तन्वीर सादिक म्हणाले, ‘‘ आम्ही अशोक चक्राचा पूर्ण आदर करतो, परंतु त्याचा गैरवापर केला आहे.’’
‘‘हो, ते (जम्मू-काश्मीर वक्फ बोर्ड) बरखास्त केले पाहिजे कारण जर कोणी जम्मू-काश्मीरची सामाजिक बांधणी नष्ट करू इच्छित असेल आणि धार्मिक भावना दुखावू इच्छित असेल तर त्यांना या जागेवर बसण्याचा अधिकार नाही. पोलिसांनी याविरुद्ध कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही अशोक चक्राचा पूर्ण आदर करतो, परंतु संबंधितांनी त्याचा गैरवापर केला आहे. आम्ही सभागृह समितीची मागणी देखील करत आहोत,’’ असे आमदार सादिक एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
‘‘१-२ दिवसांत, आम्ही सभापतींना कळवू आणि तपशील उघड करू… नॅशनल कॉन्फऱ्नस कधीही हिंसाचाराचे समर्थन करत नाही, परंतु धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे ही प्रतिक्रीया आली,’’ असे ते म्हणाले.