कोल्हापूर : प्रतिनिधी : जयप्रभा स्टुडिओच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी आवश्यक निधी मागणी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत. स्टुडिओच्या संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दहा कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. स्टुडिओमध्ये पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास नव्याने चित्रीकरण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. (Jayprabha)
नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी लेखी पत्राद्वारे जयप्रभा स्टुडिओमध्ये अत्याधुनिक यंत्रणा, सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता एक कोटी निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली. आमदार क्षीरसागर यांच्या पत्राची दखल घेत जयप्रभा स्टुडिओच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी आवश्यक निधी मागणी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत. (Jayprabha)
आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, जयप्रभा स्टुडिओ ही वास्तू कोल्हापूरचा अनमोल ठेवा आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होत असताना त्यातील ९६ वर्षांचा एकट्या कोल्हापूरचा वाटा आहे. यामध्ये जयप्रभा, शालिनी यासारख्या स्टुडिओंनी सिनेमा निर्मितीचा पाया रचून ठेवला. १९३४ मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी छत्रपती सिनेटोन निर्माण केला. त्यानंतर कलातपस्वी भालजी पेंढारकर यांनी हा वारसा जपला. या स्टुडिओत शो मॅन राजकपूर यांच्या चेहऱ्याला नारदाच्या भूमिकेत पहिला मेकअप लागला. या स्टुडिओमध्ये अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले. सध्या या ऐतिहासिक स्टुडिओची सद्यस्थितीत दुरावस्था झाली आहे. सिनेसृष्टीच्या वारशाला पुन्हा उभारी देण्याकरिता आणि चित्रीकरणासाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्रणा, सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. (Jayprabha)
कोल्हापूरची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या संवर्धन व सुशोभिकरणासाठी आमदार क्षीरसागर यांनी एक कोटी निधीची तरतूद अशी मागणी केली आहे. उप मुख्यमंत्री शिंदे यांनी क्षीरसागर यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निधी मागणीचा प्रस्ताव तयार करण्याची सुचना केली. (Jayprabha)
दहा कोटी निधींची मागणी
जयप्रभा स्टुडिओ पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून आणखी दहा कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणार आहे. येत्या काळात कलेच्या या माहेरघरात कलाकारांचा आणि चित्रिकरणाचा ओघ पुन्हा सुरु झाल्याचे दिसून येईल, असा विश्वासही आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केला. (Jayprabha)
हेही वाचा :
फुले’ चित्रपटावर ब्राह्मण महासंघाने घेतलेले आक्षेप कितपत योग्य?