पुणे : प्रतिनिधी : इस्त्रोच्या जडणघडणीत योगदान देणारे ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूष डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे वयाच्या १०० वर्षी निधन झाले. जन्मभूमी कोल्हापूर असलेल्या चिटणीसांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र पदवी संपादन करत रेडिओ संपर्कशात्र विषयात पदविकास अभ्यासक्रम पूर्ण केला होता. नुकतीच त्यांनी २५ जुलै २०२५ मध्ये वयाची शंभरी पूर्ण केली होती. (Chitnis)
अवकाश संशोधनाचा पाया घालणारे डॉ. विक्रम साराभाई यांच्या सुचनेनंतर अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस् तंत्रज्ञान संस्थेतून ते भारतात अवकाश संशोधन आणि क्ष किरण संशोधनासाठी परतले. १९६० ते १९७० माध्ये त्यांनी क्ष किरण आणि अवकाश संशोधन विषयावर संशोधन केले. त्यांनी विक्रम साराभाईसह भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमात त्यांनी काम केले. अवकाश उपयोजन केंद्राचे संचालक म्हणुन त्यांनी जबाबदारी निभावली. उपग्रह प्रक्षेपणासाठी त्यांनी थुम्बा हे स्थळ शोधले होते. (Chitnis)
डॉ. चिटणीस यांचा भारताचा अवकाश क्षेत्रातील इन्सॅट मालिकेतील उपग्रहाच्या आखणीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. विज्ञान क्षेत्रातील डॉ. चिटणीस यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले होते. (Chitnis)