मुंबई : प्रतिनिधी : ‘भाजपच्या मुख्यमंत्री तुमचा बाप बसला आहे’ या मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावरुन उडालेल्या वादावर आता खासदार नारायण राणे यांनी ‘मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो’ अशी समज नितेश राणेंना दिली आहे. (Rane warns Nitesh)
धाराशिव येथील भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मंत्री नितेश राणे यांनी ‘भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसलेला आहे’ असे वक्तव्य मित्रपक्षांना उद्देशून केले होते. राणे यांच्या वक्तव्यावरुन शिवसेना शिंदे गटात तीव्र प्रतिक्रिया उमटली. नितेश राणे यांचे बंधू शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी नितेश यांनी जपून बोलावे असा सल्लाही सोशल मिडियावर दिला होता. (Rane warns Nitesh)
दरम्यान या वाक्याचे पडसाद मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत उमटले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत ‘आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत’ असे प्रत्युत्तर दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही राणे यांच्या वक्तव्य चुकीचे असल्याचे मत व्यक्त करत असे बोलणे टाळले पाहिजे असे मत व्यक्त केले. (Rane warns Nitesh)
आज खासदार नारायण राणे यांनीही पुत्र नितेश याच्या वक्तव्याबद्दल असहमती दर्शवली. मुख्यमंत्री हा महाराष्ट्रातील जनतेचा सेवक असतो. कोणाचा बाप नसतो. मी मुख्यमंत्री असताना मला साहेब म्हणून नका, मी जनतेचा सेवक आहे, असे लोकांना सांगत होतो. हीच समज नितेश राणेंना दिली आहे, असे नारायण राणे म्हणाले. (Rane warns Nitesh)