नवी दिल्ली : पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहांच्या जोडगोळीचा करिश्मा दिसत असून भाजप मतमोजणी कलात १४६ जागा जिंकून सत्तासमीप पोहचली आहे. तीन वेळा सत्तेत राहिलेल्या ममता बॅनर्जी यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागणार आहे. गेली अनेक दशके डीएमके, एआयडीएमके यांना बाजूला सारून तामिळनाडूच्या जनतेने अभिनेता थलपती विजय याच्या टीव्हीके पक्षाला भारी बहुमत दिले आहे. केरळमध्ये डाव्यांना मागे सारुन काँग्रेसने सत्तेकडे कूच केले आहे. आसाममध्ये भाजपची सत्ता कायम राहणार आहे. पाँडेचरीमध्ये भाजपने बाजी मारली आहे. (BJP’s Magic in Bengal)
पश्चिम बंगालमध्ये २९३ जागेसाठी मतमोजणी सुरू झाली. सुरवातीला ममता बॅनर्जी यांचा तृणमुल काँग्रेस आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पहायला मिळाली. त्यानंतर भाजपने जोरदार मुसंडी मारली. पण त्यानंतर तृणमुल काँग्रेसने कमबॅक केले असले तरी मतमोजणीच्या कलामध्ये भाजप सत्तेनजीक पाहोचला आहे. भाजपने बहुमताकडे वाटचाल केली असून १५४ जागेवर पुढे आले. तृणमुल काँग्रेस ११२ जागेवर आघाडी आहे. ममता बॅनर्जींना मोठा फटका बसला आहे. BJP’s Magic in Bengal)
तामिळनाडूच्या राजकारणात द्रविड विचारसरणीवर श्रद्धा ठेवणारे डीएमके, अण्णा डीमके यांची आलटून पटलून सत्ता येत होती. पण यावेळी पारंपरिक डीएमके, एआयडीएमके या दोन्ही पक्षांना डावलून टीव्हीएके पक्षाला जनतेने कौल दिला आहे. १५७ जागा मिळवून नव्याने स्थापन झालेला टीव्हीके सत्तेचा दावेदार बनला आहे. विद्यमान डीएमके २३ जागांवर तर एआयडीएमके ४२ जागांवर आघाडीवर आहे. टॉलीवूड स्टार थलपती विजयच्या टीव्हीकेचा तामिळनाडूवर झेंडा फडकला आहे.
केरळाबद्दल सत्ता परिवर्तन होण्याची दाट शक्यता असून काँग्रेस आघाडीची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. सत्ताधारी डावी आघाडी पिछाडीवर पडली आहे. आसाममध्ये भाजपचे घोडदौड सुरू आहे. तिथे हेमंत बिस्वा यांची जादू चालली आहे. पाँडेचरीतही भाजप आघाडीची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. BJP’s Magic in Bengal)