बेळगाव : कर्नाटक भाजपचे विधान परिषदेचे आमदार सीटी रवी यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. कर्नाटकच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल रवी यांना बागेवाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. विशेष कोर्टासमोर रवी यांना हजर करण्यात आले. प्रकरणाची सुनावणी झाली. (CT Ravi)
सिद्धरामया यांचे सरकार हुकूमशहाप्रमाणे वागत आहे. प्रत्येक गोष्टीला अंत असतो. ही हुकूमशाहीही फार काळ चालणार नाही, असे विधान रवी यांनी कोर्टासमोर हजर होण्याआधी केले. चुकीची तक्रार नोंदवून मला जीवे मारण्याचा कट होता, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप करत टीका केली.
मंत्री हेब्बाळकर यांना रवी यांनी गुरुवारी शिविगाळ केली होती. तसेच त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली होती. हेब्बाळकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७५ आणि ७९ अंतर्गत रवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यावर बेळगाव येथील असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात जोरदार गदारोळ उडाला. दरम्यान अध्यक्ष बसवराज होराट्टी यांनी सभागृह तहकूब केले. त्यानंतर झालेल्या घमासान चर्चेदरम्यान, रवी यांनी हेब्बाळकरांबद्दल वारंवार अनुचित भाषा वापरल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.
रवी यांनी हेब्बाळकर यांच्याविरोधात अश्लील भाषा वापरली असल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.
विधान परिषदेचे सदस्य यांनी मंत्री हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लील भाषा वापरली, हा फौजदारी गुन्हा आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी याबाबत सभापती आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. हे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण आहे. पोलिस फौजदारी प्रक्रियेनुसार कारवाई करतील, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (CT Ravi)
VIDEO | Here’s what Karnataka Deputy CM DK Shivakumar (@DKShivakumar) said on BJP leader CT Ravi’s remarks on state minister Lakshmi Hebbalkar.
“BJP talks about culture, Sanskriti and dharma, but what happened today is shameful. It’s absolutely disgusting for BJP to have such… pic.twitter.com/S4WLX2Rb86
— Press Trust of India (@PTI_News) December 19, 2024
हेही वाचा :