मेलबर्न : गतविजेता यानिक सिनर, अमेरिकेचा बेन शेल्डन यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीमध्ये पोलंडची इगा स्वियातेक आणि अमेरिकेची मॅडिसन कीज् यांनी उपांत्य फेरी गाठली. (Sinner)
इटलीच्या सिनरला या स्पर्धेत अग्रमानांकन आहे. बुधवारी उपांत्यपूर्व सामन्यात त्याने यजमान ऑस्ट्रेलियाच्या आठव्या मानांकित ॲलेक्स डिमिनॉरचा ६-३, ६-२, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सिनरने अवघ्या १ तास ४८ मिनिटांमध्ये हा सामना जिंकला. आता उपांत्य फेरीत त्याची लढत २१ व्या मानांकित बेन शेल्डनशी होईल. शेल्डनने इटलीच्या लोरेंझो सोनेगोला चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-४, ७-५, ४-६, ७-६(७-४) असे पराभूत केले. हा सामना तब्बल ३ तास ५० मिनिटे रंगला. शेल्डनने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये प्रथमच उपांत्य फेरी गाठली असून ग्रँड स्लॅम स्पर्धेत तो दुसऱ्यांदा उपांत्य सामना खेळणार आहे. यापूर्वी, २०२३ मध्ये तो ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. (Sinner)
महिला एकेरीमध्ये द्वितीय मानांकित इगा स्वियातेकने अमेरिकेच्या एमा नाव्हारोला ६-१, ६-२ असे सहज नमवले. स्वियातेक दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. यापूर्वी, २०२२च्या स्पर्धेमध्ये तिला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. उपांत्य फेरीत तिची लढत १९ व्या मानांकित मॅडिसन कीज् हिच्याशी होईल. उपांत्यपूर्व फेरीत मॅडिसनने युक्रेनच्या एलिना स्विटोलिनावर एका सेटची पिछाडी भरून काढत ३-६, ६-४, ६-४ अशी मात केली. मॅडिसनला तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्यात यश आले. यापूर्वी, २०१५ आणि २०२२ मध्येही तिने उपांत्य फेरी गाठली होती. (Sinner)
The world No.1 is just as big a fan of tennis as the rest of us, of course he watched Nole vs Carlitos!@janniksin • #AO2025 pic.twitter.com/EAgXk7WHLA
— #AusOpen (@AustralianOpen) January 22, 2025
हेही वाचा :
बुमराह अग्रस्थानी कायम