मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबईने मंगळवारी संघ जाहीर केला. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे यांना या संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. गतविजेत्या मुंबईची उपांत्यपूर्व लढत ८ फेब्रुवारीपासून हरियाणाशी लाहली येथे होणार आहे. (Suryakumar)
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली नुकताच भारताने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ४-१ असा विजय मिळवला. तथापि, सूर्यकुमारला या मालिकेत विशेष कामगिरी करता आली नव्हती. पाच सामन्यांत त्याला केवळ २८ धावा करता आल्या. यांपैकी दोनवेळा तर त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. या मोसमाच्या सुरुवातीस सूर्यकुमार महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून खेळला होता. आता हरियाणाविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार आपला फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल, अशी आशा मुंबईचे चाहते बाळगून आहेत. (Suryakumar)
शिवम दुबेला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांत संधी मिळाली होती. त्यांपैकी एका सामन्यात त्याने ३४ चेंडूंमध्ये ५३ धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात १३ चेंडूंमध्ये ३० धावा करण्याबरोबरच २ विकेटही घेतल्या. मागील महिन्यात दुबे मेघालयविरुद्धच्या रणजी सामन्यात मुंबईकडून खेळला होता. आता टी-२० मालिकेतील कामगिरीची पुनरावृत्ती त्याला हरियाणाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात करता येते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (Suryakumar)
मुंबई संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, आंग्क्रिश रघुवंशी, अमोघ भटकळ, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर आणि हर्ष तन्ना.
Knockout time!
Our power-packed squad is ready for the #RanjiTrophy Quarter Final battle.
#MCA #Mumbai #Cricket #BCCI pic.twitter.com/b1LteVzgqo
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) February 4, 2025
हेही वाचा :