Home » Blog » प्रियांका गांधींच्या सभेची जय्यत तयारी

प्रियांका गांधींच्या सभेची जय्यत तयारी

काँग्रेस करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

by प्रतिनिधी
0 comments
Priyanka Gandhi

कोल्हापूर; प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची उद्या शनिवारी १६ गांधी मैदान वरुणतीर्थवेश येथे दुपारी एक वाजता प्रचार सभा होणार आहे. गांधी यांची सभा यशस्वी करण्यासाठी काँग्रेस नेते, पदाधिकारी युद्धपातळीवर कार्यरत होते. गांधी मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. प्रियांका गांधीच्या सभेच्या माध्यमातून काँग्रेस जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. (Priyanka Gandhi)

केरळमधील वायनाड येथून प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवत आहेत. बुधवारी या मतदारसंघात मतदान झाले. मतदान आटोपून प्रियांका गांधी महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात प्रचारात सक्रीय झाल्या आहेत. शनिवारी कोल्हापुरात दुपारी एक वाजता गांधी यांची सभा होणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन भव्य मंडप उभारण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी सभामंडपस्थळाची पाहणी करुन प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार, शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन चव्हाण आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.

सभेला राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यात काँग्रेस पाच जागा लढवत आहे. कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील, हातकणंगलेतून आमदार राजूबाबा आवळे, शिरोळमधून गणपतराव पाटील, करवीरमधून राहुल पाटील, कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर हे उमेदवार आहेत. प्रियांका गांधी यांच्या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तयारी केली आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काँग्रेसबद्दल देशभर उत्सुकता वाढली आहे. जनतेचा पक्षावरचा विश्वास वाढला आहे. प्रियांका गांधीही काँग्रेस पक्ष जगला पाहिजे, वाढला पाहिजे, मोठा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. नेतृत्व दोन पावले चालते तेव्हा कार्यकर्ते दहा पावले चालतात. प्रियांका गांधी यांच्या सभेने कार्यकर्त्यांना दहा हत्तीचे बळ मिळणार आहे.

-आमदार सतेज पाटील

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00