Home » Blog » Stalin oppose NEP: तमिळ भाषेसाठी ‘दुसऱ्या युद्धाची’ तयारी

Stalin oppose NEP: तमिळ भाषेसाठी ‘दुसऱ्या युद्धाची’ तयारी

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा इशारा

by प्रतिनिधी
0 comments
Stalin oppose NEP

नवी दिल्ली : तमिळ भाषेसाठी आमची ‘दुसऱ्या युद्धाची’ तयारी आहे. केंद्र सरकारने भरीव आर्थिक मदत दिली तरीही तामिळनाडू एनईपीवर स्वाक्षरी करणार नाही, याचा पुनरूच्चार तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मंगळवारी  केला.(Stalin oppose NEP)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून (एनईपी) ‘हिंदी लादण्या’चा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकार शिक्षणाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्याचा निधीही मोठ्या प्रमाणात केंद्राने रोखून धरल्याचा आरोपही स्टॅलिन यांनी केला.

‘‘राज्याने २,००० कोटी रुपयांसाठी अधिकार गमावले तर तमिळ समाज २,००० वर्षे मागे जाईल. मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन असे पाप कधीच करणार नाहीत,’ असेही ते म्हणाले. (Stalin oppose NEP)

एनईपी सामाजिक न्यायाची गळचेपी करीत आहे. तमिळ भाषेसाठी आणि तमिळ जनतेच्या हिताविरोधातील धोरणे त्यात आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

“एनईपी आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही. पण आमच्यावर भाषा लादण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आम्ही नेहमीच प्रतिकार करू,” असे स्टॅलिन यांनी ठामपणे सांगितले. एनईपीला त्यांचा विरोध केवळ हिंदीचा प्रचार करतो म्हणून नाही तर या धोरणामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळांतून बाहेर ढकलले जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. (Stalin oppose NEP)

डीएमके ढोंगी :  सौंदराजन

दरम्यान, भाषेच्या मुद्द्यावरून डीएमके ढोंगीपणा करीत आहे, असा आरोप भाजप नेत्या तमिलिसाई सौंदराजन यांनी केला. तसेच स्टॅलिन यांच्यावर टीकाही केली.

तामिळनाडूतील पोल्लाची येथील रेल्वे स्थानकावरील हिंदी फलक द्रमुक कार्यकर्त्यांनी कथितपणे काढून टाकल्याच्या अलीकडील घटनेकडे त्यांनी लक्ष वेधले. (Stalin oppose NEP)

सौंदराजन यांनी या कृत्याचा निषेध करत म्हटले की, ही सार्वजनिक मालमत्ता आहे आणि आम्ही राजकीय पक्षांचे असले कृत्य खपवून घेणार नाही. सर्व मंत्र्यांची मुले आणि नातवंडे सीबीएसई शाळांमध्ये शिकत आहेत, तीन भाषा शिकत आहेत. त्यांच्या आणि त्यांच्या मंत्र्यांच्या कुटुंबातील किती मुले फक्त दोन भाषा शिकत आहेत ते उघड करावे, असे आव्हान त्यांनी एमके स्टॅलिन यांना दिले.

तमिळनाडूतील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी द्रमुक भाषेच्या राजकारणाचा वापर करत असल्याचा आरोपही सौंदर्यराजन यांनी केला. तसेच स्टॅलिन यांच्या दुटप्पीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Stalin oppose NEP) ‘डीएमके शाळांमध्ये हिंदीला विरोध करत असताना, ते त्यांच्या मुलांना तीन भाषा शिकवणाऱ्या सीबीएसई शाळांमध्ये शिकू देतात,’ असे त्या म्हणाल्या. निवडणुकीतील फायद्यासाठी भाषेच्या मुद्द्याचे राजकारण केले जात असल्याचा दावा करून त्यांनी भारताच्या इतर भागांमध्ये तमिळ मुलांना भेडसावणाऱ्या संवादाच्या समस्यांकडेही लक्ष वेधले.

हेही वाचा :

सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00