Home » Blog » Srinath, Menon : श्रीनाथ, मेनन यांचा पाकला जाण्यास नकार

Srinath, Menon : श्रीनाथ, मेनन यांचा पाकला जाण्यास नकार

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमधूनही बाहेर

by प्रतिनिधी
0 comments
srinath-menon

मुंबई : भारताचे पंच नितीन मेनन आणि सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आहे. परिणामी, हे दोघे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपासूनही लांब राहणार आहेत. १९ फेब्रुवारी ते ९ मार्चदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. (Srinath, Menon)

“मेनन यांनी वैयक्तिक कारणांस्तव पाकमध्ये जाण्यास नकार दिला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारताचे सामने दुबई येथे खेळवण्यात येणार आहेत. परंतु, नियमांनुसार आयसीसी स्पर्धांमध्ये त्रयस्थ देशांचे पंच असल्याने मेनन भारताच्या सामन्यांमध्ये काम पाहू शकत नाहीत. त्यांमुळे, साहजिकच ते या स्पर्धेपासून लांब राहणार आहेत,” अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. (Srinath, Menon)

श्रीनाथ हे मागील काही काळापासून सातत्याने दौऱ्यांवर असल्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे रजेची विनंती केली आहे. सध्या श्रीनाथ हे भारत-इंग्लंड मालिकेमध्ये सामनाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. “नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात मी सातत्याने दौरे करतो आहे. त्यामुळे, मी रजेची विनंती केली आहे,” असे श्रीनाथ म्हणाले. श्रीनाथ यांच्या अनुपस्थितीत डेव्हिड बून, रंजन मदुगले आणि अँड्र्यू पायक्रॉफ्ट हे आयसीसीच्या एलिट पॅनलचे सदस्य सामनाधिकारी म्हणून काम पाहतील.

आयसीसीने बुधवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काम पाहणाऱ्या १२ पंचांची नाव जाहीर केली. या स्पर्धेतील सामने कराची, लाहोर, रावळपिंडी आणि दुबई येथे रंगणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा पाकमध्ये जाणार की नाही, हेसुद्धा बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही. (Srinath, Menon)

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पंच : कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, ॲड्रियन होल्डस्टोक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड कॅटलबरो, एहसान रझा, पॉल रायफल, शर्फुद्दोला इब्न-ए-शाहीद, रॉडनी टकर, ॲलेक्स वार्फ, ज्योएल विल्सन.

हेही वाचा :

अभिषेकची दुसऱ्या स्थानी झेप

वन-डे सामन्याच्या तिकिटांसाठी झुंबड

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00