Home » Blog » Srilanka Australia : श्रीलंकन फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाची दाणादाण

Srilanka Australia : श्रीलंकन फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाची दाणादाण

फिरकी गोलंदाज डुनिथ वेलालेजने चार गडी बाद

by प्रतिनिधी
0 comments
Srilanka Australia

महाराष्ट्र दिनमान डेस्क : कसोटीत सपाटून मार खाणाऱ्या श्रीलंकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला चांगलाच इंगा दाखवला. लंकेच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन संघाची दाणादाण उडाली. फिरकी गोलंदाज डुनिथ वेलालेजने चार गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा संघ १०७ धावांवर गारद झाला.  श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा १७४ धावांनी दणदणीत पराभव करत चॅम्पियन स्पर्धेच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियाच्या संघावर चांगलेच दडपण आणले. Srilanka Australia

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांच्या संघाची चाचणी घेत असलेल्या ऑस्ट्रेलियाला कोलंबोमध्ये २८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले. त्यांचा संघ १०७ धावात गुंडाळला. त्यांचे शेवटचे सात गडी फक्त २८ धावांत गमावले. असिथा फर्नांडोने चार षटकांत २३ धावांत ३ बळी घेऊन श्रीलंकेला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी सामन्यावर एकतर्फी नियंत्रण मिळवले. वेलालेजने जोश इंग्लिसला एका स्किडी आर्म बॉलने बाद केले. नंतर ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. त्याने ३५ धावांत ४ बळी घेतले. वानिन्दु हसरंगाने तीन बळी घेतले, ज्यामध्ये स्मिथचा समावेश होता. Srilanka Australia

श्रीलंकेच्या प्रथम फलंदाजी करताना २८२ धावा केल्या. कुसल मेंडिसने उत्कृष्ट फलंदाजी करत शतक झळकावत १०१ धावा केल्या. त्याचे हे पाचवे एकदिवसीय शतक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले शतक आहे. निशान मदुष्काने ५१ धावांचे योगदान दिले, तर असलंकाने ६६ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ७८ धावा केल्या. कुसल आणि मदुष्का यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कुसलने असलंकासोबत चौथ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. Srilanka Australia

या विजयाने श्रीलंकेला गतविजेत्या संघाविरुद्ध २-० असा मालिका विजय मिळवून दिला. एकदिवसीय क्रमवारीत पाचव्या स्थानावर नेले. २०२३ च्या विश्वचषकात नवव्या स्थानावर राहिल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेची अनुपस्थिती या कामगिरीने अधोरेखित केली. श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका म्हणाला, ‘आपण ऑस्ट्रेलियाला अनेकदा हरवत नाही, पण आज आमचा दिवस होता. फिरकीपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नसल्यामुळे निराश झालो असलो तरी  महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्यापुढे पुन्हा अशी वेळ येऊ नये यासाठी आमचे प्रयत्न राहतील.’

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला, ‘श्रीलंका संघ मालिका विजयासाठी पात्र होता. कोलंबोमध्ये आम्हाला थोडा संघर्ष करावा लागला. त्यांचे गोलंदाज उत्कृष्ट होते.’

पाकिस्तान आणि दुबईमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाने त्यांच्या संघात पाच बदल केले. मॅक्सवेल, तनवीर संघा, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस आणि बेन द्वारशुइस यांचा समावेश होता. अॅलेक्स केरी, मार्नस लाबुशेन, कूपर कॉनोली, स्पेन्सर जॉन्सन आणि नाथन एलिस यांना संघातून वगळण्यात आले.

हेही वाचा :

दक्षिण कोरियाचा भारतावर विजय

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00