Home » Blog » Srilanka : श्रीलंकेने केला शेवट गोड

Srilanka : श्रीलंकेने केला शेवट गोड

अखेरच्या ‘वन-डे’मध्ये न्यूझीलंडवर १४० धावांनी मात

by प्रतिनिधी
0 comments
Srilanka

ऑकलंड : श्रीलंकेने शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या वन-डे सामन्यामध्ये १४० धावांनी विजय नोंदवून शेवट गोड केला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यामुळे यजमान न्यूझीलंडने २-१ असा मालिकाविजय साकारला. अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने ८ बाद २९० धावा करून न्यूझीलंडचा डाव १५० धावांत संपवला. (Srilanka)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला पथुम निसंका, कुसल मेंडिस आणि जनिथ लियानगे यांच्या अर्धशतकांमुळे २९० धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर निसंकाने ४२ चेंडूंमध्ये ६ चौकार व ५ षटकारांसह ६६ धावांची वेगवान खेळी केली. मेंडिसने ४८ चेंडूंमध्ये ५ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा केल्या. लियानगेने ५२ चेंडूंमध्ये ३ चौकार व २ षटकारांसह ५३ धावा फटकावल्या. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्रीने ४, तर मिचेल सँटनरने २ विकेट घेतल्या. (Srilanka)

श्रीलंकेच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडचे बहुतांश फलंदाज सपशेल अपयशी ठरले. मार्क चॅपमनचा अपवाद वगळता न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजास वैयक्तिक वीस धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. चॅपमनने ८१ चेंडूंमध्ये १० चौकार व एका षटकारासह ८१ धावा करून एकाकी लढत दिली. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो, महेश तिक्षणा आणि एशान मलिंगा यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. २६ धावांत ३ विकेट घेणाऱ् फर्नांडो सामनावीर ठरला. मालिकेत एकूण ९ विकेट घेणाऱ्या मॅट हेन्रीला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. (Srilanka)

  • संक्षिप्त धावफलक :
  • श्रीलंका – ५० षटकांत ८ बाद २९० (पथुम निसंका ६६, कुसल मेंडिस ५४, जनिथ लियानगे ५३, मॅट हेन्री ४-५५, मिचेल सँटनर २-५५) विजयी विरुद्ध न्यूझीलंड – २९.४ षटकांत सर्वबाद १५० (मार्क चॅपमन ८१, नॅथन स्मिथ १७, असिथा फर्नांडो ३-२६, महेश तिक्षणा ३-३५, एशान मलिंगा ३-३५).

हेही वाचा :

सात्विक-चिराग उपांत्य फेरीत पराभूत

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00