Home » Blog » South Africa Team : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

South Africa Team : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

बावुमाकडे नेतृत्व; नॉर्किया, एन्गिडीचे पुनरागमन

by प्रतिनिधी
0 comments
South Africa

केपटाउन : पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. तेम्बा बावुमाकडे या संघाचे कर्णधारपद असून लुंगी एन्गिडी, एन्रिक नॉर्किया या अनुभवी गोलंदाजांनी संघात पुनरागमन केले आहे. (South Africa Team)

नॉर्किया पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे मागील महिन्यात पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळू शकला नव्हता. एन्गिडीला मूत्रपिंडाच्या दुखापतीमुळे काही महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. या दुखापतीतून सावरल्यानंतर तो ‘एसए-२०’ या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये पार्ल रॉयल्स संघातर्फे खेळतो आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ही नॉर्किया व एन्गिडी यांची अनुक्रमे सात व चार महिन्यानंतरची पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. (South Africa Team)

दक्षिण आफ्रिकेने २०२३ च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरी गाठली होती. मागील वर्षी रंगलेल्या आयसीसी टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये आफ्रिकेचा संघ उपविजेता होता. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आफ्रिकेचा समावेश ग्रुप बीमध्ये असून त्यांचा सलामीचा सामना २१ फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानशी होईल. (South Africa Team)

संघ : तेम्बा बावुमा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्ज, टोनी डेझोर्झी, रायन रिकलटन, एडन मार्क्रम, हेन्रिक क्लासेन, रॉसी व्हॅन डर डुसन, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एन्गिडी, मार्को यान्सन, कॅगिसो रबाडा आणि एन्रिक नॉक्रिया.

हेही वाचा :

श्रेयस अय्यर बनला पंजाबचा ‘किंग’!

: कपिलला गोळी घालणार होतो!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00