Home » Blog » Sindhu : सिंधूची विजयाने सुरुवात

Sindhu : सिंधूची विजयाने सुरुवात

महिला दुहेरीत ट्रिसा-गायत्रीला पराभवाचा धक्का

by प्रतिनिधी
0 comments
Sindhu

नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने इंडिया ओपन स्पर्धेमध्ये मंगळवारी विजयाने सुरुवात केली. महिला दुहेरीत मात्र भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपिचंद या पाचव्या मानांकित जोडीला सलामीच्या सामन्यातच पराभवाचा धक्का बसला. (Sindhu)

विवाहानंतर प्रथमच स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळणाऱ्या सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीमध्ये चायनीज तैपेईच्या सुंग शुओ यूनचा २१-१४, २२-२० असा पराभव केला. हा सामना ५१ मिनिटे रंगला. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीमध्ये भारताच्या किरण जॉर्जने जपानच्या युशी तानाकाला जवळपास सव्वा तास रंगलेल्या लढतीत २१-१९, १४-२१, २७-२५ असे हरवले. महिला दुहेरीमध्ये जपानच्या अरिसा इगाराशी-अयाको साकुरामोतो या जपानच्या बिगरमानांकित जोडीने ट्रिसा-गायत्रीवर २३-२१, २१-१९ अशी मात केली. याच गटात भारताच्या अश्विनी भट-शिखा गौतम या जोडीने मात्र विजयी सलामी दिली. अश्विनी-शिखा यांनी कॅनडाच्या जॅकी डेंट-क्रिस्टल लाय या जोडीला २२-२०, २१-१८ असे पराभूत केले. (Sindhu)

मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो या जोडीने विजयी आगेकूच केली. ध्रुव-तनिशा यांनी तैपेईच्या चेन चेंग कुआन-सू यिन हुई या जोडीला ५१ मिनिटांमध्ये ८-२१, २१-१९, २१-१७ असे नमवले. भारताच्या रोहन कपूर-ऋत्विका शिवानी गड्डे आणि सतीशकुमार करुणाकरन-आद्या वरियाथ या जोड्यांचे आव्हान मात्र मिश्र दुहेरीच्या पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. रोहन-ऋत्विका जोडीला सिंगापूरच्या याँग काई टेरी ही-यू जिआ जिन या जोडीकडून २१-१७, १८-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. फ्रान्सच्या थॉम गिक्वेल-डेल्फाइन डेलऱ्यू या जोडीने सतीशकुमार-आद्या यांचा २१-१२, २१-१० असा सरळ गेममध्ये पराभव केला. (Sindhu)

हेही वाचा :

बुमराह ठरला ‘प्लेयर ऑफ दि मंथ’

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00