मुंबई : विशेष प्रतिनिधी : कुणाल कामरा याचे गाणे म्हणजे एक प्रकारचा स्वैराचार, व्याभिचार आहे. त्याने कुणाची तरी सुपारी घेतली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.(Shinde criticises Kamra)
कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना फुटीवर केलेले व्यंगात्मक गाणे सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर ते व्हायरल झाल्यानंतर संतप्त झालेल्या शिंदे गटाच्या समर्थकांनी ज्या हॉटेलमध्ये त्यांचा शो झाला होता येथील सेटची तोडफोड केली. कामरांविरोधात गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांनी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. तर शिंदे गटाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कामरांना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. तर कामरांनी याविषयावर शिंदेंची माफी मागणार नाही. न्यायालय जो निर्णय देईल, त्याची अंमलबजावणी करेन, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. (Shinde criticises Kamra)
त्यामुळे हा विषय आणखी काही दिवस चर्चेत राहणार आहे. या विषयावर आतापर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काहीही भाष्य केले नव्हते. मात्र त्यांनी आता त्याबाबत एका वेबपोर्टलला पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. कामरांवर आरोप केले.
ते म्हणाले, ‘गेल्या अडीच वर्षापासून आपल्यावर आरोप सुरूच आहेत. पण आरोपाला मी आरोपांनी नाही तर कामातून उत्तर देतो. त्याचे फलित म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिले. त्यामुळे आमच्यावर पक्ष चोरला, चिन्ह चोरले असा आरोप जे करायचे त्यांना उत्तर मिळाले आहे. राज्यातील खरा गद्दार कोण असा सवाल करत त्यांनी निवडणुकीत राज्यातील जनतेने आम्हाला बहुमत दिल्याकडे लक्ष वेधले. ८० पैकी ६० जागा आम्हाला मिळाल्या आणि त्यांना २० च जागा मिळाल्या. (Shinde criticises Kamra)
ते म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवेच. विडंबन आम्ही समजू शकतो. अनेक कवी विडंबन करायचे, पण हा एक प्रकारचा स्वैराचार, व्याभिचार आहे. हे सुपारी घेऊन बोलण्याचे काम आहे. पण कुणाल कामराने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली. हे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, सुपारी घेऊन त्याने हे आरोप केले आहत. यावेळी शिंदे यांनी हॉटेलच्या तोडफोडीची समर्थन करत नाही, पण ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सांगितले.
हेही वाचा :
मुंबई पोलिसांच्या मदतीने ‘आयपीएल’मध्ये बेटिंग
असंवेदनशील, अमानवी