मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी शेअर बाजारात दोन्ही निर्देशांक कमालीचे आपटले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करधोरणाच्या धास्तीमुळे बाजरात विक्रीचा दबाव वाढला. त्याची परिणती निर्देशांक घसरण्यावर झाली. भारतीय शेअर बाजारातील मुंबई शेअर निर्देशांक आणि निफ्टी दोन्हींमध्ये घसरण दिसून आली. (Sensex down)
बीएसई सेन्सेक्स ७०० अंकांवर घसरला, तर निफ्टी इंट्राडे २३,३५० च्या खाली गेला. बीएसई सेन्सेक्स ५४८ अंकांनी म्हणजेच ०.७० टक्क्यांनी घसरून ७७,३११.८० वर बंद झाला. निफ्टी १८३ अंकांनी (०.७८%) घसरून २३,३७७.१० वर बंद झाला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करधोरणाच्या ताज्या इशाऱ्यांचे नकारात्मक पडसाद जागतिक बाजारांत उमटले. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. (Sensex down)
ट्रम्प यांच्या घोषणेमुळे बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे. ट्रम्प यांनी नवीन कर लागू करण्याच्या केलेल्या घोषणांमुळे जगभरातील व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकधारकांची धाकधूक वाढली आहे. त्याचा फटका शेअर बाजारावर झाला आहे.
ॲल्युमिनियमवर २५ टक्के आयात शुल्क : ट्रम्प
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प या आठवड्यात सर्व स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर २५% दर लागून करतील, अशी अपेक्षा आहे. सध्या अमेरिका आयात करणाऱ्या अन्य देशांतील मालावर आयात शुल्क लादण्याची योजना आखत आहेत. परंतु त्यात कोणत्या राष्ट्रांचा समावेश असेल किंवा त्यातून सूट देण्यात येईल, याचे निर्देश नाहीत. (Sensex down)
कॅनडा आणि मेक्सिकोमधून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अमेरिकेत स्टील निर्यात होते. त्यातही कॅनडा हा अमेरिकेत ॲल्युमिनियमचा सर्वात मोठा पुरवठादार आहे.
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर, कॅनडाने ट्रम्प यांच्या धोरणांचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होईल. ऑस्ट्रेलियानेही असाचा इशारा दिला आहे. ट्रम्पनी आपले धोरण पुढे नेल्यास हजारो अमेरिकनांसमोर नोकऱ्या गमावण्याचा धोका आहे.
हेही वाचा :