Home » Blog » ‌Satwik Chirag : सात्विक-चिरागची विजयी सलामी

‌Satwik Chirag : सात्विक-चिरागची विजयी सलामी

महिला दुहेरीत तनिशा-अश्विनी जोडीचा विजय

by प्रतिनिधी
0 comments
satwik chirag

जकार्ता : सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या आघाडीच्या जोडीने इंडोनेशिया मास्टर्स  बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत विजयी सलामी दिली. महिला दुहेरीत तनिशा क्रॅस्टो-अश्विनी पोनप्पा या जोडीनेही पहिल्या फेरीत विजय नोंदवला. (‌‌‌‌Satwik Chirag)

इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या दुहेरीच्या मुख्य फेरीस मंगळवारपासून सुरुवात झाली. सात्विक-चिराग जोडीने पहिल्या फेरीत चायनीज तैपेईच्या झी रे चेन-यू चिए लिन या जोडीला २१-१६, २१-१५ असे नमवले. दुसऱ्या फेरीत या जोडीचा सामना थायलंडच्या कित्तिनपाँग केड्रेन-डेचापॉल पुवारानुक्रोह या जोडीशी होईल. महिला दुहेरीमध्ये तनिशा-अश्विनी जोडीने थाडलंडच्या ओम्निचा जोंगसाथापोर्नपार्न-सुकिता सुवाचाई या जोडीचा २१-६, २१-१४ असा पराभव केला. पुढी फेरीमध्ये त्यांची लढत सिंगापूरच्या पेई की गो-मेई शिंग तेओ या जोडीशी होईल. (‌‌‌Satwik Chirag)

एकेरी गटात पात्रता फेरीच्या सामन्यांमध्येही भारतीय बॅडमिंटनपटूंनी विजयी कामगिरी केली. भारताच्या आयुष शेट्टीने भारताच्याच किदाम्बी श्रीकांतवर २१-७, २१-१५ अशी मात करून मुख्य फेरी गाठली. मुख्य फेरीत त्याचा पहिला सामना चीनच्या यू क्वी शी याच्याशी होईल. महिला एकेरीच्या पात्रता फेरीमध्ये भारताच्या तान्या हेमंतने तैपेईच्या क्लोऊ ताँग तुंगला १६-२१, २१-१७, २१-१५ असे पराभूत केले. मुख्य फेरीत तिची झुंज इंडोनेशियाच्या रॅचनॉक इंतानॉनशी होईल. (‌‌‌Satwik Chirag)

भारताच्याच इशारानी बरुआला मात्र पात्रता फेरीमध्ये पराभव पत्करावा लागला. इंडोनेशियाच्या चिआरा मार्व्हेला हांदोयोने इशारानीला २१-१८, २२-२० असे हरवले. एकेरीच्या मुख्य फेरीतील लढतींना बुधवारपासून सुरुवात होणार आहे. पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत भारताचे किरण जॉर्ज, प्रियांशू राजावत, लक्ष्य सेन हे बॅडमिंटनपटू खेळणार आहेत. महिला एकेरीमध्ये पीव्ही सिंधूसह अनुपमा उपाध्याय, आकर्षी कश्यप, रक्षिता रामराज या भारतीय खेळाडू मुख्य फेरीत खेळतील. (‌‌‌Satwik Chirag)

हेही वाचा :
झ्वेरेव, सबालेंका उपांत्य फेरीत

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00