Home » Blog » Satej trophy : ‘खंडोबा’चा ‘प्रॅक्टिस’ वर मोठा विजय

Satej trophy : ‘खंडोबा’चा ‘प्रॅक्टिस’ वर मोठा विजय

सतेज चषक फुटबॉल स्पर्धा

by प्रतिनिधी
0 comments
Satej trophy

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर ६-१ असा गोलफरकाने दणदणीत विजय मिळवला. खंडोबाच्या प्रभू पोवारने शानदार हॅटट्रीक साजरी केली. पाटाकडील तालीम मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. (Satej trophy)

खंडोबा तालीम मंडळाने आज अफलातून खेळ केला. त्यांनी प्रॅक्टिस क्लबला डोके वर काढून दिले नाही. पूर्वार्धात १७ व्या मिनिटाला प्रॅक्टिसवर स्वयंगोल झाला. २६ व्या मिनिटाला नवीन रेघूने खंडोबा संघाच्या दुसऱ्या गोलची नोंद केली. मध्यंत्तरास खंडोबा संघ २-० असा आघाडीवर होता. (Satej trophy)

उत्तरार्धात प्रॅक्टिसच्या सूरज जाधवने ४६ व्या मिनिटाला मैदानी गोल करत सामना २-१ अशी स्थितित आणला. प्रॅक्टिस संघ बरोबरी साधणार असे वाटत असताना खंडोबा संघाने सामन्यावर एकतर्फी पकड मिळवली. त्यांच्या प्रभू पोवारने ५५ व्या मिनिटाला पहिल्या गोलची नोंद केली. त्यानंतर ६५ आणि ६९ व्या मिनिटाला सलग दोन गोल करत प्रभू पोवारने हॅटट्रीकची साजरी केली. ७३ व्या मिनिटाला संकेत मेढेने गोल केला. पाच गोलची घसघसीत आघाडी टिकवत खंडोबा संघांने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. हॅटट्रीकची नोंद करणाऱ्या प्रभू पोवारची सामनावीर म्हणून निवड झाली. (Satej trophy)

मंगळवारचा सामना : बालगोपाल तालीम मंडळ वि. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, दुपारी ४.०० वा.

हेही वाचा :

केकेआर’च्या कर्णधारपदी अजिंक्य रहाणे

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00