Home » Blog » Sanju Samson : सॅमसनच्या नेतृत्वाचा मार्ग मोकळा

Sanju Samson : सॅमसनच्या नेतृत्वाचा मार्ग मोकळा

यष्टिरक्षण करण्यास बीसीसीआयकडून परवानगी

by प्रतिनिधी
0 comments
Sanju Samson

मुंबई : आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसनचा संघाचे नेतृत्व करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर फॉर एक्सलन्सने संजूला यष्टिरक्षण करण्यासाठी फिट ठरवले आहे. त्यामुळे पुढील सामन्यापासून संजू हा राजस्थान संघाचा यष्टिरक्षक व कर्णधार अशा दुहेरी भूमिकेत दिसेल. (Sanju Samson)

या वर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेदरम्यान सॅमसनच्या उजव्या हाताची तर्जनी फ्रॅक्चर झाली होती. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला पाच आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. दुखापतीतून सावरल्यानंतर बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याने सराव सुरू केला. तथापि, त्याच्या फिटनेस चाचणीनंतर आयपीएलमधील सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये त्याला केवळ फलंदाज म्हणून सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली होती. परिणामी, राजस्थानने बदली कर्णधार म्हणून रियान परागकडे धुरा सोपवली, तर ध्रुव जुरेलने या सामन्यांत यष्टिरक्षणाची जबाबदारी पार पाडली. (Sanju Samson)

रविवारी, गुवाहाटी येथे चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा सामना खेळल्यानंतर संजू पुन्हा एनसीएमध्ये दाखल झाला. तिथे त्याची फिटनेस चाचणी करून त्याला यष्टिरक्षण करण्यास हिरवा कंदिल दाखवण्यात आला. त्यामुळे, ५ एप्रिल रोजी राजस्थानच्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात संजू यष्टिरक्षक व कर्णधार असेल. राजस्थानला यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये केवळ एक विजय मिळवता आला असून गुणतक्त्यात राजस्थानचा संघ नवव्या स्थानी आहे. (Sanju Samson)

आकाशदीप मुंबईविरुद्ध खेळण्याची शक्यता लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज आकाश दीप हा पाठीच्या दुखापतीतून सावरला असून तो मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये, बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमध्ये भारताकडून खेळकताना आकाशदीपच्या पाठीची दुखापत बळावली होती. तेव्हापासून आकाशदीप कोणत्याही स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळलेला नाही. मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळलेल्या आकाशदीपला लिलावामध्ये लखनौने ८ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. आता तो शुक्रवारी मुंबईविरुद्ध लखनौकडून पदार्पण करण्याची शक्यता आहे. लखनौचा प्रमुख वेगवान गोलंदाज मयंक यादव हा अगोदरच दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याच्या पार्श्वभूमीवर आकाशच्या परतण्याने लखनौला मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा :
न्यूझीलंडची विजयी आघाडी
सूर्यकुमारच्या आठ हजार धावा पूर्ण

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00