नवी दिल्ली : प्रतिनिधी : क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी भारतीय कुस्ती महासंघ वरील बंदी उठवली. त्यामुळे देशांतर्गत स्पर्धा आयोजित करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि तदर्थ समिती प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत होती. (Sanjay singh)
क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) निलंबन मागे घेतले आहे. संस्थेचे नियंत्रण संजय सिंह यांच्याकडे सोपवले आहे. संजय सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे जवळचे सहकारी आहेत. त्यामुळे महासंघावर ब्रिजभूषण यांचे वर्चस्व राहणार आहे. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीगीरांचा लैगिंक छळ केल्याचा आरोप होता. या निर्णयामुळे जॉर्डन अम्मान येथे होणाऱ्या अशियाई चॅम्पयिनशिप स्पर्धेत भारताचा अधिकृत संघ उतरु शकणार आहे. २५ ते ३० मार्च या कालावधीत स्पर्धा होणार आहे. (Sanjay singh)
क्रीडा मंत्रालयाने आदेशात असे म्हटले आहे की, “स्पॉट व्हेरिफिकेशन कमिटीचे निष्कर्ष, भारतीय कुस्ती महासंघाने केलेले शिस्तीचे उपाय आणि भारतीय क्रीडाक्षेत्राच्या दृष्टीने आणि खेळाडूंच्या हिताच्या दुष्टीने युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन रद्द करत आहे. आणि कुस्तीसाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघ (एनएसएफ) म्हणून त्यांची मान्यता पुनर्स्थापित करत आहे”. (Sanjay singh)
२४ डिसेंबर २०२३ रोजी क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन केले होते. भारतीय ऑलिंपिक असोसिएशननला राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात सांगितले होते. कुस्ती महासंघाने १५ वर्षाखालील आणि वीस वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जाहीर करण्यात घाई केल्याबद्दल महासंघावर बंदी घातली होती. त्यावेळी संजय सिंग यांच्या पॅनेलने २१ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूकीत विजय मिळवला होता. गोंडा येथील नंदिनीनगर येथे राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. या ठिकाणी ब्रिजभूषण शरण सिंह यांची मजबूत पकड होती. (Sanjay singh)
बंदी उठवल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे काम सुरळीत होणार आहे. देशांतर्गत विविध गटातील राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन होणार आहे. त्यामुळे नवोदित मल्लांची कुचंबणा थांबणार आहे. तसेच अशियाई आणि जागतिक स्पर्धेसाठी भारताचा अधिकृत पाठवता येणार आहे. (Sanjay singh)
हेही वाचा :
हॅरी ब्रुकची दुसऱ्यांदा ‘आयपीएल’मधून माघार
विजयाच्या जल्लोषाला हिंसेचे गालबोट