सांगली : टेंभू विस्तारीत प्रकल्पातील घटक कामांच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेतून लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या सहाव्या टप्प्याला दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे नाव देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. (Sangli News)
टेंभू विस्तारीत प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील तीन घटक कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विटा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे प्रमुख उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ योजनांना भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे त्या क्षेत्रातील जमीन ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी टेंभू विस्तारित प्रकल्पांतील विविध कामांची माहिती घेतली. (Sangli News)
तत्पूर्वी, खानापूर तासगाव कालवा, सुळेवाडी (विटा) (ता. खानापूर) येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह सुहास बाबर, अमोल बाबर आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
- रोहित सेनेचा डंका; कानपूर कसोटीत ७ विकेट राखून विजय
- केशवराव भोसले नाट्यगृहासाठी २५ कोटी निधी मंजूर
- Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजे यांच्या ‘स्वराज्य’ला मिळाले चिन्ह