Home » Blog » सांगली : व्यापारी पेठेत स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी काँग्रेसचे आंदोलन

सांगली : व्यापारी पेठेत स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी काँग्रेसचे आंदोलन

Sangli News : स्वच्छतागृहांची सोय करण्याची महापालिकेने केली मागणी मान्य : पृथ्वीराज पाटील

by प्रतिनिधी
0 comments
Sangli News

सांगली; प्रतिनिधी : आज (दि.१५) पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी पेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची तातडीने सोय करावी यासाठी निदर्शने करुन आंदोलन केले. व्यापारी पेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची सोय झाली पाहिजे, नागरिक, व्यापारी व ग्राहकांच्या मुलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. (Sangli News)

सांगली शहरातील बाजारपेठेत गणपती पेठ, सराफ कट्टा, मेन रोड(कापड पेठ), हरभट रोड, दत्त – मारुती रोड, शिवाजी मंडई, फुले मंडई आदी येत असून परिसरात अंदाजे १००० ते १५०० व्यापारी आस्थापना आहेत. यामध्ये बहुसंख्येने महिला कर्मचारी काम करतात. यासह बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या महिलांसाठी एकही महिला स्वच्छतागृह नाही. यामुळे परिसारात येणाऱ्या महिलांना कुचंबना होत आहे. त्यामुळे महिलांसाठी दोन दिवसात तात्पुरते सुसज्ज महिला स्वच्छतागृह उभे करावे आणि भविष्यात परिसरातील सुलभ शौचालयाच्या धर्तीवर महिला व पुरुषांसाठी कायमस्वरूपी स्वच्छतागृहे उभी करावीत अशी मागणी आज (दि.१५) शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली सराफ कट्टा – कापड पेठ चौकात आंदोलन करण्यात आले. (Sangli News)

यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी व्यापारी पेठेत एकही स्वच्छता गृह नसल्याने महिला व पुरुषांची कुचंबणा होत आहे, नागरिक, व्यापारी व ग्राहक यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. या भागातील ड्रेनेज, पाणी, लाईट या सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात. यासह नवीन जागा निश्चित होईपर्यंत मुव्हेबल स्वच्छतागृहे तातडीने उभारण्यात यावेत. अशा मागण्या केल्या. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी बाजारपेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची मुव्हेबल स्वरुपात तात्पुरती सोय तातडीने करण्याचे मान्य केले. जागा निश्चित करुन लवकरच कायमस्वरूपी स्वच्छतागृहे उभारण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शितल सदलगे, चेतन दडगे, मयूरेश पेडणेकर, नितीन तावदारे, प्रशांत देशमुख, सचिन घेवारे, सुनील व दिपक पिराळे,गोपाळ बलदवा, उमेश बियाणी, विलास खेराडकर, चंद्रकांत मालवणकर,रचना तकटे, अभिषेक बजाज, संजय व आर. व्ही. काळेबेरे, रघुनाथ नार्वेकर, राजन खान व अभिजित रामचंद्रे, ग. र. कुर्णेकर, गुलाबराव खराडे,सिध्दार्थ पेंडुरे, एस. एस. माणिक, शैलेंद्र शिंदे, रमण व विजय सारडा, प्रशांत अहिवळे,गजानन पोतदार, गौरव गायकवाड, हेमंत मोरे, नागराज शेट्टी, सुदर्शन माने, पृथ्वीराज बोंद्रे, विशाल पाटील व गणपती पेठ, कापड पेठ, सराफ कट्टा, गणपती मंदिर व दत्त मारुती रोड आणि भाजी मंडईतील व्यापारी, विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Sangli News)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00