नवी दिल्ली : १९८४ च्या शीखविरोधी दंगल आणि हत्येप्रकरणी काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांना विशेष न्यायालयाने मंगळवारी (२५ फेब्रुवारी) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.(Sajjan Kumar)
दिल्लीतील सरस्वती विहारमध्ये नोव्हेंबर १९८४ मध्ये करण्यात आलेल्या पिता-पुत्राच्या हत्येप्रकरणी कुमार यांना दोषी ठरवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात, सरकारी वकिलाने निर्भया प्रकरण आणि तत्सम निर्णयांचा हवाला देत सज्जन कुमार यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी केली. (Sajjan Kumar)
या निकालावर प्रतिक्रिया देताना शीख नेते गुरलाद सिंग म्हणाले, ‘‘आम्ही सज्जन कुमार यांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे या मागणीवर ठाम आहोत. न्यायालयाच्या निकालावर आम्ही समाधानी नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागून सज्जन कुमारला फाशी ठोठावण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती सरकारला करणार आहोत.”
सज्जन कुमारना सध्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीख समुदायाला लक्ष करण्यात आले. त्यांच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आले. जाळपोळ करण्यात आली. या हिंसक जमावाचे नेतृत्व सज्जन कुमार यांनी केल्याचा आरोप सज्जन कुमार यांच्यावर आहे.
यातील फिर्यादी, जसवंत यांच्या पत्नी आहेत. जमावाने घरावर हल्ला केला. त्यात त्यांच्या पत्नी जखमी झाल्या. लुटालूट करण्यात आली. पुरुषांची हत्या करण्यात आली. आणि त्यांचे घर पेटवून दिले, असा फिर्यादीत म्हटले आहे. (Sajjan Kumar)
गेल्या आठवड्यात, दिल्ली न्यायालयाने कुमार यांना चार दशकांपूर्वी उत्तर-पश्चिम दिल्लीतील सरस्वती विहार येथे घडलेल्या या हत्येसाठी दोषी ठरवले. दंगलीशी संबंधित दुसऱ्या खुनाच्या खटल्यात कुमार आधीच जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
न्यायमूर्ती बावेजा यांनी दिलेल्या १३९ पानी निकालात पीडितांची दुर्दशा पाहिल्यानंतरही पोलिस निष्क्रिय राहिले. त्यांच्या या भूमिकेवर कोर्टाने टीका केली. बेकायदा जमाव जमवून जसवंत आणि तरुणदीप सिंग यांची हत्या केली. त्याला कुमार हे जबाबदार आहेत. क्रूरपणे हल्ला करून या दोघांना जिवंत जाळण्यात आले, असे न्यायालयाने म्हटले आहे. (Sajjan Kumar)
हल्लेखोरांनी जसवंत सिंग यांची पत्नी, मुलगी आणि भाची यांनाही मारहाण केली. महिलांनी जसवंत आणि त्यांच्या मुलाला कसे बेदम मारहाण केली आणि गंभीर दुखापत झाली हे सांगितले. जसवंत यांना वाचवण्याच्या प्रयत्नात, जसवंत यांच्या पत्नी त्यांच्या अंगावर पडला. तिच्या भाचीने त्यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दोघीही महिला जखमी झाल्या, जसवंत यांच्या पत्नीच्या हातातील बांगड्या जबरदस्तीने काढून घेण्यात आल्या. त्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, असे फिर्यादीत म्हटले होते.
हेही वाचा :
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी
बॉम्बच्या धमकीने विमान रोमला वळवले