नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ राजधानी दिल्लीत शुक्रवार (२१ फेब्रुवारी) झाला. लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे.(Sahitya sammelan)
तालकटोरा मैदान येथे होणाऱ्या संमेलनाचा प्रारंभ सकाळी ग्रंथदिंडीने झाला. दिंडीची सुरुवात संसद परिसरातील प्रेरणास्थळापासून करण्यात आला. (Sahitya sammelan)
दुपारी साडेचारच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विज्ञान भवनात साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते . देशाच्या राजधानीत तब्बल ७१ वर्षानंतर होत असलेल्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून साहित्य रसिक दाखल झाले आहेत. उद्घाटन सत्रानंतर तालकटोरा स्टेडिअममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत साहित्य संमेलन होईल.
संध्याकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत दुसरे उद्घाटन सत्र होणार आहे. सुशीलकुमार शिंदे, उदय सामंत, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हे सत्र पार पडेल.संध्याकाळी ७.३० ते रात्री १० वाजेपर्यंत निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे.

मराठी पाऊल पडते पुढे
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, २२ फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या विषयावर मान्यवरांची मुलाखत होणार आहे. याशिवाय, ‘लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी’, ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ आणि ‘मधुरव’ असे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यशवंतराव चव्हाण सभामंडपात ‘बहुभाषिक कवी संमेलन’ आणि ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ अशा विषयांवर परिसंवाद होणार आहे.
७० हून अधिक नामांकित प्रकाशक संस्थांचा सहभाग
या संमेलनात ७० हून अधिक नामांकित प्रकाशक संस्था सहभागी होत आहेत. तसेच विविध शासकीय, अशासकीय तसेच खासगी वितरक संस्थांचे १०६ स्टॉल लागले आहेत. प्रकाशकांना याआधी भेडसावलेल्या अडचणी आणि समस्यांची दखल घेत अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि सरहद संस्थेने पुस्तक तसेच अन्य साहित्य विक्रीच्या स्टॉलबाबत नियोजन केले आहे. प्रत्येक स्टॉलच्या प्रतिनिधींना दिल्लीत राहण्यासह इतरही सवलती देण्यात आल्याने केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून अनेक प्रकाशक संस्थांनी या संमेलनात स्टॉल उभारले आहेत. दुसरीकडे या संमेलनात अनेक नामवंत साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशनही होणार असल्याचे सांगण्यात आले. (Sahitya sammelan)
हेही वाचा :
नवसमाज निर्मितीत साहित्याला श्रेष्ठ स्थान
देशाच्या प्रगतीत साहित्याचा मोठा वाटा