Home » Blog » Rishabh Pant : रिषभ पंतला ‘लॉरियस’ पुरस्कारासाठी नामांकन

Rishabh Pant : रिषभ पंतला ‘लॉरियस’ पुरस्कारासाठी नामांकन

सर्वोत्कृष्ट पुनरागमनाच्या विभागात अन्य खेळाडूंसह शर्यतीत

by प्रतिनिधी
0 comments
Rishabh Pant

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रीडाविश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या लॉरियस पुरस्कारासाठी यावर्षी भारताचा क्रिकेटपटू रिषभ पंतला नामांकन मिळाले आहे. कार अपघातानंतरच्या दीड वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतच्या कामगिरीची लॉरियसने दखल घेतली आहे. त्याला २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंमध्ये नामांकन मिळाले आहे. (Rishabh Pant)

लॉरियस पुरस्कारांचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. स्पेनमधील माद्रिद येथे २१ एप्रिल रोजी होणाऱ्या सोहळ्यात पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात येईल. रिषभसोबत या विभागात ब्राझीलची जिम्नॅस्ट रेबेका अँड्राडे, अमेरिकेचा जलतरणपटू कॅलेब ड्रॅसेल, स्वित्झर्लँडची स्किईंगपटू लारा गट-बेहरामी, स्पेनचा मोटरसायकलस्वार मार्क मार्क्वेझ आणि ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू आरियार्न टिटमस हे खेळाडू शर्यतीत आहेत. (Rishabh Pant)

रिषभ डिसेंबर, २०२२ मध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर तो पुन्हा चालू शकेल का, याविषयीही प्रश्नचिन्ह होते. मात्र, रिषभ इच्छाशक्ती आणि चिकाटीच्या जोरावर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरला. २०२४च्या इंडियन प्रीमियर लीगद्वारे रिषभने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि या स्पर्धेतील प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाची दारे ठोठावली. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपद्वारे त्याने भारतीय संघामध्ये पुनरागमन केले. भारताने हा वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यानंतर, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेद्वारे त्याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्येही पुनरागमन केले. त्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत शतक झळकावून आपले पुनरागमन साजरे केले होते. (Rishabh Pant) या वर्षीच्या आयपीएल मोसमासाठी झालेल्या लिलावामध्ये रिषभ पंत सर्वांत महागडा खेळाडू ठरला होता. लखनौ सुपरजायंट्सने रिषभला २७ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. लॉरियस पुरस्काराच्या अन्य विभागांमध्ये स्पेनचा फ्रेंच ओपन व विम्बल्डन विजेता टेनिसपटू कार्लोस अल्कारेझला वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. ऑस्ट्रेलियन ओपन व अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या आर्यना सबालेंकाला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूच्या विभागामध्ये नामांकन आहे. (Rishabh Pant)

हेही वाचा :

 ‘केकेआर’च्या कर्णधारपदी अजिंक्य रहाणे

दोन्ही संघांवर सारखेच दडपण

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00