नवी दिल्ली : प्रतिनिधी : वयाची ७५ वर्षे झाल्यावर सत्तेच्या पदावर कुणीही राहू नये हा नियम नरेंद्र मोदी यांनी केला आहे. हा नियम लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसह अनेकांना लागू केला आहे. मग या नियमाच्या पलिकडे नरेंद्र मोदी आहेत का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील संबधाबद्दलही भाष्य केले. (Raut question)
संजय राऊत म्हणाले, ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर कुणीही पदावर राहू नये असा नियम मोदींनी केला होता. या नियमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मान्यता होती. या नियमाबद्दल चर्चा करण्यासाठी नरेंद्र मोदी संघाच्या कार्यालयात गेले होते. सप्टेंबर महिन्यात मोदी वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावे लागते. (Raut question)
निवृत्तीच्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रतिक्रियेवर संजय राऊत म्हणाले, बाप जिवंत असताना वारसदार ठरवला जात नाही. ही मुघल संस्कृती आहे असे फडणवीसांचे म्हणणे आहे. देशाला बाप नाही. मोदी हे पंतप्रधान आहेत. ही तात्पुरती व्यवस्था आहे. राम आणि कृष्णही अवतारकार्य संपल्यावर गेले होते. नरेंद्र मोदीचेही अवतारकार्य संपले आहे. त्यांनाही निघून जावे लागेल. (Raut question)
लालकृष्ण अडवाणी जिंवत असतानाही शहाजहानप्रमाणे कोंडून ठेवले अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले, भाजपचा डोलारा अडवाणींनी उभा केला. दोन जागावरुन सत्तेच्या शिखरावर नेण्यासाठी काम अडवाणीसारख्या संघर्षमय नेत्याने केले आहे. अडवाणीचा पंतप्रधान पदाचा हक्क होता. राष्ट्रपतीपदाचाही हक्क होता. पण त्यांना मोगल संस्कृतीप्रमाणे बंदीवान आणि बेदखल केले. आणि स्वत: मोदी पंतप्रधान झाले. तेव्हा आम्ही विचारले नाही ही मोगल संस्कृती आहे का?, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. (Raut question)
संघ आणि भाजपचे संबध कसे असायला हवे यावर माझ्यासारख्या बाहेरच्या व्यक्तीने मत करणे चुकीचे आहे. पण आतमध्ये काय सुरू आहे, याची आपल्याकडे माहिती आहे, असा दावा राऊत यांनी केला. तुम्ही जसे आमच्या घडामोडीची माहिती ठेवता तसेच तुमच्या अंतर्गत घडामोडीची माहितीही आम्ही ठेवत असतो असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची मुदत संपलेली आहे. तरीही भाजप आणि त्याचे शिखर पुरुष अध्यक्ष नेमू शकलेले नाहीत. भाजपला अध्यक्ष नेमताना संघाची भूमिका मान्य करावे लागेल अशी आमची माहिती आहे. भाजपने आत्तापर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष नेमला असता पण नड्डांना मुदतवाढ दिली जात आहे. पण पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. काहीतरी शिजत आहे. ते काय शिजत आहे हे लवकर कळेल असेही राऊत म्हणाले. (Raut question)
हेही वाचा :
ट्रम्प यांच्या ‘मुक्ती दिना’चा ‘बाजार’!