नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात गौतम अदानी अभियोग प्रकरणावरील प्रश्न फेटाळून लावला. त्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टीकास्र सोडले. अमेरिकेतही मोदीजींनी अदानींना भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून वाचवले! “मोदीजींसाठी, मित्राचा खिसा भरणे ही ‘राष्ट्रनिर्मिती’ आहे, तर लाचखोरी आणि राष्ट्रीय संपत्तीची लूट ही सोयीस्करपणे ‘वैयक्तिक बाब’ बनते, असे राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्टमध्ये म्हटले आहे. (Rahul slams modi)
पंतप्रधान मोदी त्यांच्या ‘मित्राला’ ‘वैयक्तिक बाब’ म्हणत ‘संरक्षण’ देत आहेत. घरातील प्रश्नांवर मौन, परदेशात मात्र ती त्यांच्यासाठी ‘वैयक्तिक बाब’! ठरते, अशी टीकाही राहुल गांधी यांनी टीका केली.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पीएम मोदींना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी गौतम अदानी आरोपाच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र तो मोदी यांनी फेटाळून लावला. (Rahul slams modi)
‘भारत ही लोकशाही आहे आणि आमची संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम’ आहे. आम्ही संपूर्ण जग एक कुटुंब मानतो. माझा विश्वास आहे की प्रत्येक भारतीय माझा आहे. दोन देशांचे दोन प्रमुख नेते अशा वैयक्तिक विषयांवर कधीही चर्चा करत नाहीत,’ असे मोदी म्हणाले. त्यांच्या या युक्तिवादाचा समाचारा राहुल गांधी यांनी घेतला आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, अदानी, त्याचा पुतण्या सागर अदानी आणि अदानी समूहातील अनेक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. भारतातील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कराराशी संबंधित अडीचशे दशलक्ष डॉलर्सच्या लाचखोरीच्या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने सिक्युरिटीज आणि वायर फ्रॉडचा आरोप लावला. ‘अदानी’ने अमेरिकेतील गुंतवणूकदारांची दिशाभूल केली, असे म्हटले आहे. अदानी समूहाने हे आरोप बिनबुडाचे म्हणत फेटाळले. (Rahul slams modi)
गेल्या वर्षी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. इंडिया आघाडीने सभागृहात निषेध नोंदवत सभात्याग केला होता.
देश में सवाल पूछो तो चुप्पी,
विदेश में पूछो तो निजी मामला!अमेरिका में भी मोदी जी ने अडानी जी के भ्रष्टाचार पर पर्दा डाल दिया!
जब मित्र का जेब भरना मोदी जी के लिए “राष्ट्र निर्माण” है, तब रिश्वतखोरी और देश की संपत्ति को लूटना “व्यक्तिगत मामला” बन जाता है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 14, 2025
हेही वाचा :