जयपूर : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि विश्वविजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या समर्पणभावाचे बरेच दाखले दिले जातात. गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाच्या सराव शिबिरामध्येही त्याचा प्रत्यय आला. डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो मेडिकल बुटमध्ये असतानाही द्रविडसर कुबड्यांच्या साहाय्याने मैदानावर आले आणि त्यांनी राजस्थानच्या खेळाडूंना मार्गदर्शन केले. (Rahul Dravid)
मागील आठवड्यामध्ये बेंगळुरू येथे एका क्लब सामन्यादरम्यान द्रविड यांच्या डाव्या पायास दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे द्रविड यांचा पाय सध्या मेडिकल बुटमध्ये आहे. मात्र, राजस्थानचे मुख्य प्रशिक्षक असणारे द्रविड गुरुवारी या मेडिकल बुटसहीत जयपूर येथील सराव शिबिरामध्ये दाखल झाले. यावेळी त्यांना चालण्यासाठी कुबड्यांचा आधार घ्यावा लागत होता. द्रविड यांनी रियान पराग, यशस्वी जैस्वाल या खेळाडूंसोबत संवादही साधला. द्रविड यांच्या या कर्तव्यनिष्ठतेचा व्हिडिओ रायस्थान रॉयल्स संघातर्फे एक्सवर (ट्विटर) पोस्ट करण्यात आला असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (Rahul Dravid)
जयपूरपूर्वी राजस्थान रॉयल्सचे सराव शिबीर गुवाहाटीमध्ये पार पडले होते व त्यावेळी नुकतीच दुखापत झाली असल्यामुळे द्रविड उपस्थित राहिले होते. आयपीएलमध्ये राजस्थानचा संघ यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळत असून यंदाच्या मोसमातील त्यांचा सलामीचा सामना सनरायझर्सशी २३ मार्चला होणार आहे. (Rahul Dravid)
https://twitter.com/rajasthanroyals/status/1900035019609117001?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1900047943107064286%7Ctwgr%5E1d8fbb5013e0183d86fc70ae4a9b655ffe22ec27%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fipl-2025%2Finjured-rahul-dravid-arrives-for-rajasthan-royals-ipl-2025-camp-on-crutches-internet-says-never-seen-7913721
हेही वाचा :
मार्शला खेळण्यास परवानगी, पण…