नवी दिल्ली : संसदेत मला बोलूच दिले जात नाही. सभागृहात हा काय प्रकार सुरू आहे ते समज नाही, असा संताप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी (२६ मार्च) केला. तसेच खा. राहुल गांधी यांनी अध्यक्ष ओम बिर्ला संसदेत बोलण्याची संधी नाकारत असल्याचा गंभीर आरोप केला.(Rahul alleges Birla)
लोकसभेचे कामकाज लोकशाही प्रणालीच्या विरूद्ध चालवले जात आहे. सभागृहात महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्याची विनंती वारंवार करूनही अध्यक्ष त्यांकडे दुर्लक्ष करतात, याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
‘मला माहित नाही काय चाललंय… मी त्यांना (सभापतींना) बोलू देण्याची विनंती केली, पण ते पळून गेले. मला बोलू दिले नाही. सभागृह चालवण्याचा हा मार्ग नव्हे,’ असे गांधी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. (Rahul alleges Birla)
आगामी महाकुंभमेळा आणि बेरोजगारीच्या वाढत्या मुद्द्यावर बोलण्याचा मी प्रयत्न करत होतो, पण मला वारंवार रोखण्यात आले. जेव्हा जेव्हा मी उभा राहतो तेव्हा मला बोलण्यापासून रोखले जाते. येथे लोकशाहीला स्थान नाही.
खा. राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते
सभागृहाची प्रतिष्ठा राखा : बिर्ला
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखणे अपेक्षित आहे. सदस्यांनी कार्यपद्धतीच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे त्यांना सांगितले. त्यावर सभापतींनी असे निरीक्षण का नोंदवले, ते स्पष्ट झालेले नाही. सदस्यांनी सभागृहाचा उच्च दर्जा आणि प्रतिष्ठा कायम राहील, अशा पद्धतीने वागावे अशी अपेक्षा आहे, असे बिर्ला म्हणाले. (Rahul alleges Birla)
“माझ्या निदर्शनास अशी अनेक उदाहरणे आली आहेत जिथे सदस्यांचे वर्तन सभागृहाच्या उच्च दर्जाला अनुरूप नाही,” असे सभापती म्हणाले.
“या सभागृहात वडील आणि मुलगी, आई आणि मुलगी, पती आणि पत्नी सदस्य राहिले आहेत. या संदर्भात, विरोधी पक्षनेत्याने नियम ३४९ नुसार वागावे अशी माझी अपेक्षा आहे, विशेषतः, विरोधी पक्षनेत्याने नियमांनुसार वागणे अपेक्षित आहे,” असे सभापती म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, सभापतींनी त्यांच्यावर टीका केली आणि नंतर त्यांना बोलण्याची संधी न देता सभागृह तहकूब केले. त्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यातही त्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.
काँग्रेस नेत्यांची अध्यक्षांशी चर्चा
दरम्यान, लोकसभेचे उपनेते गौरव गोगोई, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर यांच्यासह सुमारे ७० काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खासदार राहुल गांधी यांना सभागृहात बोलण्याची संधी नाकारल्याचा मुद्दा उपस्थित केला, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा :
उच्च न्यायालयातील ७७ टक्के न्यायाधीश उच्च जातीचे