प्रयागराज : महाकुंभसाठी येणाऱ्या भाविकांचा महासागर लक्षात घेऊन प्रयागराज शहरात चारही बाजूंनी बॅरिकेडिंग करण्यात आले. त्यामुळे शहरात येणाऱ्या भाविकांवर नियंत्रण आणण्यात यश आले असले तरी शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर ५० किलोमीटरपर्यंत वाहनांचा रांगा लागल्या आहेत. शेकडो भाविक २५ ते ३० किलोमीटर चालत महाकुंभ स्नानासाठी येत आहेत. भाविकांचा विरोध होऊ नये म्हणून मालवाहू ट्रकची भिंत उभारण्यात आली आहे. (prayraj overloaded)
संगमाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्याच्या पुढे असलेल्या दोन किलोमीटर मार्गावर काहीच गर्दी नाही. भाविकांनी विरोध करु नये म्हणून ट्रक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पुढचा रस्ता दिसत नाही. अनेक मार्ग एकेरी केले असल्याने वेगवेगळ्या मार्गावरून येणारी वाहने समोरासमोर येत असल्याने ‘एकेरी’ची योजना कुचकामी ठरली आहे. (prayraj overloaded)
एकेरी मार्गावर वाहनचालकांची परीक्षा
प्रयागराज शहरात येणाऱ्या मार्गावर गेले तीन दिवस वाहतूक खोळंबली आहे. शहरात बाहेर जाण्यासाठी केलेले डायव्हर्जन बॅरिअर्स आणि प्रयागराज शहरात अनेक ठिकाणी उभारलेल्या बॅरिकेड्सच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शहरात सर्वत्र वाहतूकक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अनेक लोक चुकीच्या मार्गाने वाहने घुसवत आहेत. त्यामुळे अनेक वाहने अमोरासमोर येत आहेत. अनेक ठिकाणी वाहने शहरात संगम परिसरात पोहोचतात पण त्यांना पुढे सोडले जात नाही. त्यामुळे वाहने त्याच जागेवर पार्क केली जात असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पोलिसांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागत आहे. (prayraj overloaded)
वाहतूक खोळंबली
कानपूर, कोशंबी, लखनऊ, फैजाबाद, जौनपूर, वाराणसी, मिर्जापूर, रिवा या शहरातून प्रयागराज शहरात येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर ३० ते ५० किलोमीटर लांब वाहनांचा रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग संथ झाला आहे.. महाकुंभकडे जाणाऱ्या मार्गावर हजारो भाविक २५ ते ३० किलोमीटर मार्गावर पायी चालत जात संगमावर निघाले आहेत.
हेही वाचा :