प्रयागराज : खासगी बस आणि चारचाकीचा भीषण अपघात होऊन १० भाविकांचा मृत्यू झाला. या अपघातात १९ भाविक जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस चौकशी करीत आहेत. सर्व मृत आणि जखमी छत्तीसगडमधील आहेत. (Prayagraj accident)
शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ही भीषण घटना घडली. छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील भाविक बोलेरोमधून प्रयागराजच्या दिशेने येत होते. मिर्झापूर-प्रयागराजदरम्यान महामार्गावर एका गावाजवळ बोलेरोचालकाचे नियंत्रण सुटले. समोरून येणाऱ्या खासगी बसवर ती आदळली. बोलेरोचा चक्काचूर झाला. अपघात झाला त्यावेळी सर्व भाविक गाढ झोपेत होते. बोलेरोतील दहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला. (Prayagraj accident)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जेसीबी आणून बोलेरोमधील मृतदेह बाहेर काढले. विच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सर्व मृत कोरबा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.
अपघातग्रस्त बसही महाकुंभहून परतत होती. मध्यप्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील भाविक या बसने महाकुंभसाठी गेले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील १९ भाविक जखमी झाले आहेत. हे सर्वजण संगम स्नानानंतर वाराणसीकडे जात होते. सर्व जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Prayagraj accident)
हेह वाचा :