Home » Blog » Panhala festival : पन्हाळा किल्ल्यावर लाईट, साऊंड, लेझर शो

Panhala festival : पन्हाळा किल्ल्यावर लाईट, साऊंड, लेझर शो

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण

by प्रतिनिधी
0 comments
Panhala festival

कोल्हापूर  :  प्रतिनिधी :  संस्कृती, इतिहास आणि पर्यटनाचा विकास या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत व जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने दिनांक ४ ते ७ मार्च दरम्यान किल्ले पन्हाळगडावर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांसह ऐतिहासिक वस्तुंचे प्रदर्शन, पन्हाळगडाचा रणसंग्रमाम लघुपट अनावरण, गीतांचा कार्यक्रम, निमंत्रित चित्रकार व शिल्पकारांची प्रात्यक्षिके, रील्स, व्हिडिओ व फोटोग्राफी स्पर्धांचे आयोजन केले आहे. गुरुवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्हाळा किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या १३डी थिएटरचे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण होणार आहे, अशी माहिती पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने दिली आहे. (Panhala festival)

इंटरप्रीटेशन सेंटर पन्हाळा येथे दि.४ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता पन्हाळा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन व ऐतिहासिक वस्तुंच्या प्रदर्शनाला सुरूवात होणार आहे. पाच मार्च रोजी पन्हाळगडावर दुपारी चार वाजता  शिवतीर्थ उद्यानासमोर विद्यार्थी कलाकरांच्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील जाज्वल्य आणि प्रेरणादायी प्रसंगांवर आधारीत ऐतिहासिक नृत्य-नाट्य व शिवजन्म ते शिवराज्यभिषेक सोहळा सादर केला जाणार आहे. तर त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता संस्कार प्रस्तुत जीवनगाणे या कार्यक्रमात झी सारेगम विजेता प्रसेनजीत कोसंबी व झी सारेगम फेम स्वरदा गोडबोले यांचा मराठी व हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.(Panhala festival)

सहा मार्च रोजी इंटरप्रीटेशन सेंटर पन्हाळा येथे सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण व १३डी थिएटरचे लोकार्पण व जनसंवाद कार्यक्रम होणार आहे. सात मार्च रोजी निमंत्रित चित्रकार, शिल्पकार यांची प्रात्यक्षिके सकाळी नऊ वाजलेपासून पन्हाळा येथील अंबरखाना परिसरात आयोजित करण्यात आली आहेत. सात मार्च रोजी दुपारी चार वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील गडकिल्ले या विषयावर इंस्टाग्राम रील्स, यु ट्युब व्हिडीओ व फोटोग्राफी स्पर्धा व पारितोषिक वितरण इंटरप्रीटेशन सेंटर पन्हाळा येथे होणार आहे.(Panhala festival)

१३डी थिएटर मधून ऐतिहासिक घटनांचे होणार सादरीकरण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पन्हाळगडाला ऐतिहासिक व पौराणिक महत्व असून कोल्हापूर जिल्हयातील महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून पन्हाळगडाची प्रसिध्दी सर्वदूर आहे. पन्हाळा हे ऐतिहासिक किल्ला व थंड हवेचे ठिकाण असल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगरपरिषदेची लोकसंख्या अवघी तीन हजार आहे. परंतु नगरपरिषदेचा भौगोलिक विस्तार पन्हाळा व पावनगड या दोन किल्ल्याच्या मिळून आहे. तसेच पन्हाळा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपावन स्पर्शाने पुनीत झालेले पर्यटनस्थळ व तालुक्याचे मुख्यालय असल्याने दरवर्षी २० ते २५ लाख पर्यटक, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी भेट देतात. या ठिकाणाचे महत्त्व लक्षात घेवून या ठिकाणी पर्यटकांसाठी स्टेरीओस्कोपीक १३ डी थिएटर या कामाचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या अत्याधुनिक अशा १३ डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऐतिहासिक कलाकृती पाहता येणार आहे. सहा मार्च रोजी पन्हाळ्याचा रणसंग्राम हा लघुपट व १३डी थिएटरचा लोकर्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजना व वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत त्या ठिकाणी लाईट शो उभारणे, साऊंड शो उभारणे, लेजर शो तसेच इंटरप्रीटेशन सेंटर इमारतीचे काम व परिसराचे सुशोभिकरण करणे इत्यादी कामे करण्यात आली आहेत. (Panhala festival)

हेही वाचा :

औरंगजेब उत्तम प्रशासक; अबू आझमींचे वक्तव्य

चंद्रावर मानवी वस्ती आणि…

वडील पाकिस्तानी, आई भारतीय, मुलगी पाकिस्तानी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00