Home » Blog » पी.एम. किसान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

पी.एम. किसान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

PM Kisan : सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा

by प्रतिनिधी
0 comments
PM Kisan File Photo

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.१८ जून रोजी या योजनेचा १७ वा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला होता. आज १८ वा हप्ता ९.४ कोटी रुपये शेतकऱ्यांचा सन्मान निधी म्हणून वितरित झाला आहे,यासाठी केंद्र सरकारने २० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. (PM Kisan)

वाशीम येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबून हा हप्ता बँकेत जमा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशीम दौऱ्यावर असून त्यांनी पोहरादेवीत दर्शन घेत पूजा केली तसेच त्यांनी येथील सभेला संबोधित केले.यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.

देशभरातील छोटे आणि सीमांत शेतकरी कुटुंबांना आर्थिक साहाय्य देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. २०१८ मध्ये पहिल्यांदा योजना राबविण्यात आली. या योजनेतर्गंत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक ६ हजार रुपये जमा केले जातात. (PM Kisan)

हेही वाचा : 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00