कटक : भारत-इंग्लंड आगामी मालिकेतील कटक येथे रंगणाऱ्या दुसऱ्या वन-डे सामन्याची तिकीटे खरेदी करण्यासाठी प्रेक्षकांची बुधवारी झुंबड उडाली. यावेळी कटकच्या बाराबाती स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांना वॉटर गन्सचा माराही करावा लागला. (One-day tickets)
भारत-इंग्लंड यांच्यामध्ये ६ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील दुसरी लढत ९ तारखेला कटकमध्ये रंगणार आहे. या लढतीची ऑनलाइन तिकीटविक्री २ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. ऑनलाइन तिकीटे मिळू न शकलेल्यांसाठी स्टेडियमबाहेर ५ व ६ फेब्रुवारी रोजी ऑफलाइन तिकीटविक्री करण्यात येणार असल्याचे प्रेक्षकांना समजले. त्यामुळे, या सामन्याची ऑफलाइन तिकीटे खरेदी करण्यासाठी मंगळवारी रात्रीपासूनच बाराबाती स्टेडियमबाहेर प्रेक्षकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. काही लोक मंगळवारी रात्री स्टेडियमबाहेरच झोपले होते. बुधवारी सकाळी ९ वाजता तिकीटविक्रीला सुरुवात झाल्यानंतर ही गर्दी आवाक्याबाहेर जाऊ लागली. (One-day tickets)
या गर्दीमुळे काही लोकांना अस्वस्थ वाटू लागले, तर काहीजण बेशुद्धही पडले. अखेर चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागल्यामुळे पोलिसांना वॉटर गन्समधून मारा करावा लागला. यावेळी जमलेल्या लोकांनी गर्दीचे व्यवस्थापन योग्यरीत्या न केल्याबद्दल स्टेडियमच्या प्रशासनास दोष दिला. स्टेडियमवर पिण्याचे पाणी, तिकीट खरेदीनंतर बाहेर जाण्याकरिता स्वतंत्र मार्ग यांसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याची तक्रार लोकांनी केली. (One-day tickets)

कटक : सामन्याची तिकीट खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
कटकमध्ये पाच वर्षांनंतर वन-डे सामना खेळवण्यात येणार आहे. २०१९ मध्ये या स्टेडियमवर भारत-वेस्ट इंडिज यांच्यामध्ये वन-डे सामना रंगला होता. या सामन्यात भारताने विंडीजचा ४ विकेटनी पराभव केला होता. रोहित शर्मा, लोकेश राहुल व विराट कोहली यांनी या सामन्यामध्ये अर्धशतके झळकावली होती. ८१ चेंडूंमध्ये ९ चौकारांसह ८५ धावा करणारा विराट सामनावीर ठरला होता. त्यानंतर, जून २०२२ मध्ये भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये या स्टेडियमवर टी-२० लढतही रंगली होती. ही लढत दक्षिण आफ्रिकेने चार विकेटनी जिंकली होती.
हेही वाचा :
भारतीय संघाच्या ‘थ्रोडाउन’ सहायकास अडवले