कुचिंग : नायजेरियाच्या मुलींच्या संघाने सोमवारी एकोणीस वर्षांखालील महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये न्यूझीलंडचा धक्कादायक पराभव करून पहिलावहिला विजय नोंदवला. अन्य सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका संघांनी विजय साकारले. (Nigeria)
पावसामुळे नायजेरिया-न्यूझीलंड सामना १३ षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना नायजेरियाने ६ बाद ६५ धावा केल्या. नायजेरियाच्या लिलियन उडेहने १८, तर कर्णधार लकी पेटीने १९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या ११ षटकांत ५ बाद ४९ झाल्या होत्या. अखेरच्या दोन षटकांत विजयासाठी १७ धावांची आवश्यकता असताना बाराव्या षटकात न्यूझीलंडने ८ धावा काढल्या. अखेरच्या षटकात न्यूझीलंडला ९ धावा हव्या होत्या. परंतु, उडेहच्या या षटकात न्यूझीलंडला सहाच धावा करता आल्याने नायजेरियाने २ धावांनी विजय निश्चित केला. (Nigeria)
ग्रुप सीमधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सामोआ संघावर १० विकेटनी मात केली. सामोआचा संघ अवघ्या १६ धावांत गारद झाल्यानंतर आफ्रिकेने अवघ्या १.४ षटकांत बिनबाद १७ धावा करून विजय साकारला. इंग्लंडने पाकिस्तान संघाला ६ विकेटनी पराभूत केले. पाकचा डाव ६६ धावांत संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडने ९.२ षटकांत ४ बाद ६७ धावा केल्या. ‘ग्रुप डी’मध्ये ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा २ विकेटनी निसटता पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ९ बाद ९१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने १९.२ षटकांत ८ बाद ९२ धावांसह विजयावर शिक्कामोर्तब केले. (Nigeria)
हेही वाचा :
अग्रमानांकित सिनरचा संघर्षपूर्ण विजय