Home » Blog » Newzealand  Win : न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय

Newzealand  Win : न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय

टी-२० सामन्यात पाकवर पाच विकेटनी मात

by प्रतिनिधी
0 comments
Newzealand Win

ड्युनेडिन : यजमान न्यूझीलंडने मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पावसामुळे १५ षटकांच्या खेळवण्यात आलेल्या या सामन्यामध्ये न्यूझीलंडने पाकचा ५ विकेटनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.(Newzealand  Win)

या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पाकिस्तानने १५ षटकांत ९ बाद १३५ धावा केल्या. पाककडून एकाही फलंदाजाला अर्धशतकी मजल मारता आली नाही. कर्णधार सलमान आघाने २८ चेंडूंमध्ये ४ चौकार व ३ षटकारांसह सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. शादाब खान आणि शाहीन शाह आफ्रिदीच्या फटकेबाजीमुळे पाकला सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडता आला. न्यूझीलंडकडून जेकब डफी, बेन सिअर्स, जेम्स निशॅम आणि ईश सोधी या चौघांनीही प्रत्येकी २ विकेट घेतल्या.(Newzealand  Win)

पाकच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम सिफर्ट आणि फिन ॲलन यांनी अवघ्या ४.४ षटकांमध्ये न्यूझीलंडला ६६ धावांची सलामी दिली. पहिल्या सात षटकांमध्येच या दोघांनी ४ चौकार व १० षटकार खेचून सामन्याचा निकाल निश्चित केला. सिफर्टने २२ चेंडूंमध्ये ३ चौकार व ५ षटकारांसह ४५, तर ॲलनने १६ चेंडूंमध्ये १ चौकार व ५ षटकारांसह ३८ धावा फटकावल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या मधल्या फळीतील काही फलंदाज झटपट बाद झाले. तथापि, मिचेल हे आणि कर्णधार मायकेल ब्रेसवेल यांनी चौदाव्या षटकामध्ये संघाचा विजय साकारला. या मालिकेतील तिसरा सामना २१ मार्च रोजी ऑकलंड येथे होणार आहे. (Newzealand  Win)
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान – १५ षटकांत ९ बाद १३५ (सलमान आघा ४६, शादाब खान २६, शाहीन शाह आफ्रिदी नाबाद २२, जेकब डफी २-२०, ईश सोधी २-१७) पराभूत विरुद्ध न्यूझीलंड – १३.१ षटकांत ५ बाद १३७ (टीम सिफर्ट ४५, फिन ॲलन ३८, मिचेल हे नाबाद २१, हारिस रॉफ २-२०, खुशदिल शाह १-१६).

https://twitter.com/BLACKCAPS/status/1901877413606490151

हेही वाचा :
 सबालेंकाला हरवून अँड्रिव्हा विजेती
दुखापतग्रस्त उमरानऐवजी साकारियाची निवड

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00