माउंट माँगानुई : जेकब डफीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने मालिकेतील दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचा ४५ धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. (Newzealand Win)
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून सलामीवीर टीम रॉबिन्सनने ३४ चेंडूंमध्ये ३ चौकार व २ षटकारांसह ४१ धावा केल्या. मधल्या फळीतील मार्क चॅपमनने ४२, तर मिचेल हे याने १९ चेंडूंमध्ये ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४१ धावा फटकावल्या.
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १९.१ षटकांत १४१ धावांत संपुष्टात आला. प्रथुम निसंकाच्या ३७ आणि कुसल परेराच्या ४८ धावा वगळता श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजास मोठी खेळी करता आली नाही. या दोघांनाही डफीनेच डग-आउटचा रस्ता दाखवत न्यूझीलंडचा विजय सुकर केला. त्याने १५ धावांत ४ विकेट घेतल्या. मॅट हेन्री आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी २ विकेट घेत त्याला उपयुक्त साथ दिली. या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी २ जानेवारी रोजी रंगणार आहे. (Newzealand Win)
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : २० षटकांत ५ बाद १८६ (टीम रॉबिन्सन ४१, मार्क चॅपमन ४२, मिचेल हे नाबाद ४१, वनिंदू हसरंगा २-२८, नुवान तुषारा १-२५) विजयी विरुद्ध श्रीलंका – १९.१ षटकांत सर्वबाद १४१ (पथुम निस्संका ३७, कुसल परेरा ४८, जेकब डफी ४-१५, मॅट हेन्री २-३१, मिचेल सँटनर २-२२).
हेही वाचा :
वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील भारताची वाटचाल खडतर
ऑस्ट्रेलियाने भारताला १८४ धावांनी हरवले