Home » Blog » Neelam Shinde accident: अमेरिकेत शिकायला गेलेली साताऱ्याची मुलगी कोमात

Neelam Shinde accident: अमेरिकेत शिकायला गेलेली साताऱ्याची मुलगी कोमात

सातारच्या कुटुंबाची व्हिसा मिळवण्याची धडपड

by प्रतिनिधी
0 comments
Neelam Shinde accident

मुंबई : पोटच्या मुलीला अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे भीषण अपघात झाला. ती सध्या कोमात आहे. तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी हॉस्पिटलने तिच्या वडीलाची परवानगी तत्काळ मागितली आहे. त्यांना अमेरिकेसाठी रवाना होणे गरजेचे आहे. त्यांनी बातमी समजल्यापासून व्हिसासाठी धडपड सुरू केली आहे. मात्र अद्याप यश मिळाले नाही. ही काळीजकहाणी आहे साताऱ्याच्या तानाजी शिंदे यांची…(Neelam Shinde accident)

त्यांची ३५ वर्षीय मुलगी नीलम शिंदे सध्या मास्टर ऑफ सायन्सच्या शेवटच्या वर्षांत शिकेते. १४ फेब्रुवारी रोजी तिला एका कारने जोराची धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्या छातीला आणि डोक्याला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. तिच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाने मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांकडून तातडीने परवानगी मागितली आहे. कुटुंबाने भारत सरकारकडे व्हिसासाठी आग्रही आवाहन केले आहे.(Neelam Shinde accident)

नीलमचे वडील तानाजी शिंदे यांना अपघाताची दोन दिवसांनंतर माहिती मिळाल्यापासून ते अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळवण्यासाठी धडपडत आहेत.

“आम्हाला १६ फेब्रुवारी रोजी अपघाताची माहिती मिळाली. तेव्हापासून आम्ही व्हिसासाठी प्रयत्न करत आहोत. पण आम्हाला तो अजून मिळालेला नाही,” असे तिचे वडील सांगतात. (Neelam Shinde accident)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना हस्तक्षेप करून व्हिसा प्रक्रिया जलद करण्याची विनंती केली आहे. कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे आश्वासन त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाने लवकरात लवकर व्हिसा देण्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

“ या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. मी कुटुंबाच्या सतत संपर्कात आहे. त्यांची व्हिसाची अडचण लवकरात लवकर सोडवली जाईल,” असे खासदार सुळे यांनी एनडीटीव्हीला सांगितले.

त्या म्हणाल्या, “माझा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा अनुभव कमालीचा चांगला आहे. ते नेहमी मदतीसाठी तत्काळ प्रयत्नशील असतात,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी मुंबईतील यूएस दूतावासाशीही संपर्क साधला आहे. (Neelam Shinde accident)

नीलमच्या रूममेट्सनी दिली माहिती

नीलमला गंभीर अपघात झाल्याची माहिती तिच्या रूममेट्सनी दिली. अपघातानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले, असे त्यांनी सांगितल्याचे नीलमचे कामा संजय कदम यांनी सांगितले.

“रुग्णालय प्रशासनाने नीलमवरील मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी अमाची परवानगी मागितली. ती सध्या कोमात आहे. आम्ही या परिस्थितीत तिथे असायला हवे,” असे कदम म्हणाले. (Neelam Shinde accident) नीलमच्या प्रकृतीबाबत रुग्णालय दररोज अपडेट देत आहे, परंतु व्हिसा मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे कुटुंबीयांची घालमेल वाढली आहे. लवकरात लवकर व्हिसा मिळेल आणि मुलीसोबत राहता येईल, अशी आशा शिंदे कुटुंबीयांना वाटते.

हेही वाचा :

पाच नातलगांना पाठोपाठ संपवले

अमिषा पटेलच्या मागे लागले साधू

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00