मुंबई : विशेष प्रतिनिधी : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मला दोन वेळा फोन करून दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती केली होती, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी शनिवारी केला.(Narayan Rane)
भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत यांनी त्याबाबतचा घटनाक्रम स्पष्ट केला. तसेच तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन यांच्या वडिलांवर आदित्य ठाकरे यांचे नाव न घेण्याबाबत दबाव आणला होता, असा आरोपही केला.
मालाड येथे ५ वर्षांपूर्वी घडलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. दिशाच्या हत्यामागे आदित्य ठाकरे सुरज पंचोली, डिनो मोरेया यांच्यासह तत्कालीन महापौर पेडणेकर यांची भूमिका संशयास्पद असून याचा दावा केला आहे. याबाबत दोन एप्रिलला सुनावणी होणार आहे. (Narayan Rane)
या पार्श्वूमीवर राणे म्हणाले, मी मुंबईवरून घरी चाललो होतो, तेवढ्यात वांद्रे क्रॉस केल्यावर ठाकरेंचा पहिला फोन आला. मिलिंद नार्वेकरचा फोन होता. म्हणाले, दादा साहेबांना तुमच्याशी बोलायचे आहे. मी म्हटले कोण साहेब. म्हणाले, उद्धवजी, त्यांच्याबरोबर मी आहे. ते गाडी चालवत आहेत. त्यांना बोलायचे आहे. मी म्हटलं, द्या. त्यांनतर उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या तुम्ही जे काही प्रेसला बोलता. आदित्यचे नाव घेता. माझी विनंती आहे की, तुम्ही त्याचा उल्लेख करू नये, असे वाटते म्हणून विनंती करायला फोन केला. मी म्हटले, उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा. एक तर मी अमूक ठिकाणी, अमूक याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाही. एका निरपराध मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे म्हणतोय. आरोपींना अटक झाली पाहिजे हे म्हणतोय. त्यात तडजोड नाही, ‘असा संवाद झाला.
ते म्हणाले की, दुसरा फोन हा कोविड असताना आला. त्यावेळी माझ्या हॉस्पिटलचे उद्घाटन होते. माझी राज्य सरकारकडे एक परवानगी बाकी होती. तेव्हा त्यांचा फोन आला. तुम्ही फोन केला होता. मी म्हटलो ‘हो, कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता. उद्धव म्हणाले, ‘साहेब ते तर मिळेलच. पण तुम्हाला सांगतो जरा तुम्ही, प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरे होईल. मी म्हटलं परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणता तसा मी उल्लेख केला नाही. पण एक मंत्री होता असे मी म्हणतोय.असे राणे यांनी यावेळी सांगितले. (Narayan Rane)
विधान परिषदेत झालेल्या गोंधळाबाबत ते म्हणाले, अनिल परब यांच्यात काही धमक नाही, ते काही करू शकणार नाहीत.
‘गडकरींनाच त्या नेत्यांची नावे विचारा’
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील जनता जातीवादी नाही तर पुढारी जातीवादी आहेत, ते संभ्रम निर्माण करतात, असे एका भाषणात म्हटले आहे. त्याबाबत विचारणा केले असता राणे म्हणाले की, ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांनाच या नेत्यांची नावे विचारा आणि त्यांना पक्षातून काढून टाकणार आहात का याबद्दलही माहिती घ्या.
हेही वाचा :
न्यायाधीश मणिपूरला गेले, मोदी कधी जाणार?
पतीच्या हत्येनंतर होळी सेलिब्रेशन