मुंबई : प्रतिनिधी : नागपुरात झालेल्या हिंसाचारातील नुकसान भरपाई दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. दंगेखोरांनी पैसे न भरल्यास त्यांची प्रॉपर्टी विकून वसूल केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. (Nagpur Review)
महाराष्ट्रात अशा गोष्टी अजितबा सहन करणार नाही. दंगेखोरांना जरब बसेल अशा पद्धतीने सरळ केले जाईल, असा सज्जड दमही त्यांनी भरला.
सोमवारी दोन गटांत नागपुरात उफाळलेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या युवकाचा शनिवारी मृत्यू झाला. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांबरोबर बैठक घेतली. त्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय घेतले. (Nagpur Review)
ते म्हणाले, “नागपूरचा एकूण घटनाक्रम आणि त्यानंतरची कारवाई या सर्व गोष्टींसदर्भातील आढावा बैठक घेतली. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर सकाळी जाळण्यात आली. त्यानंतर काही लोकांनी तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. मात्र, प्रतिकात्मक कबर जाळत असताना कुराणच्या आयत लिहिलेली चादर जळाली, अशी अफवा पसरवण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार केला गेला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला.” (Nagpur Review)
जी व्यक्ती दंगा करताना दिसते, दंगेखोरांना मदत करताना दिसतेय, अशा प्रत्येकावर कारवाई करण्याची मानसिकता पोलिसांची आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियाचं ट्रॅकिंग केले आहे. जवळपास ६८ पोस्ट ओळखल्या असून डिलिट केल्या आहेत. भडकवणारे पॉस्टकास्ट, चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण केलेल्या लोकांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. (Nagpur Review)
- फडणवीस म्हणाले…
- नागपूरच्या काही भागात घातलेले निर्बंध शिथिल करण्याचा प्रयत्न
- कोणी दंगा करण्याचा प्रयत्न केल्यास अतिशय कडक कारवाई करणार
- हिंसाचार भडकावा म्हणून म्हणून ज्यांनी पोस्ट ज्यांनी केली त्या सर्वांना दंगेखोरांसोबत सहआरोपी करणार चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण केलेल्या लोकांवर कारवाई
सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलवरील चित्रिकरण, पत्रकारांनी केलेले चित्रिकरण यात जे दंगेखोर दिसत आहेत, त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. १०४ लोकांची ओळख पटली आहे. ९२ लोकांना अटक केली आहे. काही लहान मुलांवरही कारवाई सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री